शिवाजीनगर भुयारी मार्गाने घेतला शेतकऱ्याचा बळी!, नक्की काय घडलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : चिकलठाणा येथील अंकुश भावराव शंकपाळ (वय ६१) हे शेतकरी आपल्या ईव्ही मोपेडवरून शुक्रवारी (१९ सप्टेंबर) दुपारी १२:३० ला बीड बायपासकडे जात होते. शिवाजीनगर भुयारी मार्गाजवळ दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान शनिवारी (२० सप्टेंबर) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचे दोन वर्षे काम केल्यानंतर कामात अनेक त्रुटी असल्याचे वारंवार समोर येत आहे. सार्वजनिक बांधकाम, रेल्वेच्या अभियंत्यांनी या कामात अक्षम्य हलगर्जीपणा केलेला आहे. त्यामुळे आता थोडाही पाऊस झाला तरी भुयारी मार्ग तुंबतो. पावसामुळे गाळ साचतो. चिकट आणि बारीक माती भुयाराच्या दोन्ही बाजूंना जमते. अंकुश शंकपाळ यांना या मातीचा अंदाज आला नाही.

ते मोपेडने बायपासकडे जात असताना त्यांची मोपेड याच मातीमुळे घसरली आणि डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंकपाळ यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. शंकपाळ यांचा मुलगा शरद संकपाळ यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला असून, दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software