बाबा पेट्रोलपंपाजवळील ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये गांजाचा मोठा साठा जप्त, दोन तस्करांच्या मुसक्या आवळल्या

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : क्रांती चौक पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने बाबा पेट्रोल पंपासमोरील ट्रॅव्हल्सच्या पार्किंगजवळ दोन गांजा तस्करांच्या मुसक्या आवळल्‍या. त्‍यांच्याकडे ८१ हजार रुपयांचा ८ किलो १०० ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (४ ऑक्‍टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास करण्यात आली.

अनिल दंगरसिंग अरिओ (वय ३१, रा. मेलिया, जि. बडवानी, मध्य प्रदेश), रोईदास गटारिया ठाकूर (वय २४, रा. धावडा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) अशी गांजा तस्करांची नावे असून, त्‍यांच्याविरुद्ध पोलीस अंमलदार माजिद पटेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक पवन चौधरी पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले, पोलीस अंमलदार संतोष मुदीराज, भावसिंग चव्हाण, श्रीसुंदर, रवि खरात यांनी केली. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना या पथकाला गांजा तस्करीची गोपनीय माहिती मिळाली होती. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक इंगोले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...

Latest News

एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला... एमजीएमजवळ अंधारात लपून बसले होते तिघे, पोलिसांना पाहून पळाले, अंगझडती घेतली तेव्हा पोलिसांना धक्काच बसला...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एमजीएमजवळ अंधारात लपून बसलेल्या तिघांनी पोलिसांना पाहून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले...
वाळूज एमआयडीसीतील ऑर्किड इंग्रजी शाळेला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिली समज, नियमबाह्य फी वसूल करू नका!
‘तुमच्या मुलीला सुखात ठेवीन...’ प्रॉमिसवर सारिकाच्या आईने ठेवला विश्वास, प्रेमविवाहाला भरला होकार, सोपवला मुलीचा हात!; पण पुढे जे घडलं, ते धक्कादायक... छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोची हृदयद्रावक घटना
अंबादास दानवे यांना सलग ३ दिवस कॉलवर शिवीगाळ, धमक्या!; ‌चौथ्या दिवशी कॉलर थेट म्हणाला, कापून टाकू, ठोकून टाकू...
रस्ता ओलांडताना आचाऱ्याला दुचाकीने उडवले, जागीच मृत्यू, गंगापूर तालुक्यातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software