- News
- सिटी क्राईम
- औरंगपुऱ्यात थरार : लॉज व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न; धारदार शस्त्राचे वार
औरंगपुऱ्यात थरार : लॉज व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न; धारदार शस्त्राचे वार
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : धारदार शस्त्राने मान, हातांवर सपासप वार करत लॉज व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. औरंगपुऱ्यात शनिवारी (११ ऑक्टोबर) सायंकाळी ७ च्या सुमारास हल्ल्याच्या या घटनेने दहशत माजली. अनिरुद्ध विवेक जैस्वाल (रा. कुंभारवाडा) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून, क्रांतीचौक पोलिसांनी संशयित मनीष बाखरिया याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी मध्यरात्री १२ ला गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाखरिया हा एका राजकीय नेत्याचा नातेवाइक असल्याचे समोर येत आहे.
अनिरुद्ध जैस्वाल यांचे कुंभारवाड्यात लॉज आहे. लॉजसमोरच बाखरियाचे कटलरीचे दुकान आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात बाखरियाने त्याच्या दुकानासमोर अवजड दगड ठेवून रस्ता अडवला होता. त्यावेळी जैस्वाल यांचा बाखरियासोबत वाद झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद मिटवला होता. शनिवारी सायंकाळी सातला अनिरुद्ध दुचाकीने जात असताना औरंगपुऱ्यात बाखरियाने त्याच्या दुचाकीला मागून धडक दिली. धारदार शस्त्र उपसून त्याच्यावर सपासप वार केले. तुझे मैं खत्म करता हूँ, असे तो म्हणत होता. अनिरुद्ध रक्तबंबाळ होऊन कोसळल्यानंतर तो पळून गेला. नागरिकांनी अनिरुद्धला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांचे वडील विवेक जैस्वाल (रा. कुंभारवाडा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून बाखरियाला रात्री उशिरा ताब्यात घेतले.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
By City News Desk
Latest News
15 Mar 2026 17:26:08
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...

