दारूडा पती तरुणीला रोज मारहाण करायचा, हीच संधी युवकाने साधली, प्रेम जाळे फेकले, ६ वर्षे लैंगिक अत्‍याचार केला!; छ. संभाजीनगरची घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : दारूडा पती सतत मारहाण करत असल्याने २९ वर्षीय विवाहिता ३३ वर्षीय युवकाच्या जाळ्यात अडकली. त्याने सुरुवातीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्‍कार केला. नंतर लग्नाच्या आमिषाने तिच्यावर ६ वर्षे शारीरिक संबंध ठेवले. ती प्रेग्नंट राहिली असता गर्भपात करवला. जवाहरनगर पोलिसांत तिने तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी  ट्रकचालक जाकेर नजीर पठाण (वय ३३, रा. बेरीबाग हर्सूल, मूळ रा. धामणगाव, ता. फुलंब्री) याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

तक्रारदार युवतीचा पती दारूडा आहे. तो सतत तिला मारहाण करत होता. हीच संधी साधून जाकेरने तिच्यावर प्रेमाचे जाळे फेकले. या जाळ्यात तीही अडकली. मी तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. यातून २०१९ मध्ये सर्वप्रथम त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू लागला. जानेवारी २०२५ मध्ये त्याने युवती व तिच्या मुलाला समर्थनगर येथे नेऊन लैंगिक अत्याचार केला. मार्च २०२५ मध्ये ती जाककेरपासून प्रेग्नंट झाली. मात्र त्याने तिच्या मुलाला जीवे मारण्याची भीती दाखवून तिचा गर्भपातही करवला. त्यानंतर तो सतत तिच्यावर बलात्‍कार करत राहिला.

सप्टेंबर २०२५ मध्ये युवतीला कळले, की त्याचे लग्न झालेले असून, त्याला ४ मुले आहेत. लग्नाच्या आमिषाने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर युवतीने जवाहरनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बुधवारी (१ ऑक्टोबर) तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून लगेचच जाकेरच्या मुसक्या आवळल्या. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चाकू जप्त करायचा आहे. गुन्हा करण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने जाकेरची रवानगी पोलीस कोठडीत केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software