माथेफिरू चोर... चोरांच्या कारनाम्याने अवघे गाव शॉक्ड, नक्की काय विकृतपणा केला जाणून घ्या... छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भालगावची आहे घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चिकलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालगावमध्ये चोरट्याने केलेल्या विकृत कृत्‍यामुळे अवघे गाव शॉक्ड झाले आहे. या चोराने चोरीसाठी गॅरेज फोडले. दोन दुचाकी चोरल्या आणि गॅरेजला आग लावली. आगीत गॅरेजमधील २ दुचाकींसह पूर्ण दुकान खाक झाले. चिकलठाणा पोलिसांनी मंगळवारी (३० डिसेंबर) माथेफिरू चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सलमान नुर शेख (वय २५, रा. भालगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे भालगावमध्ये गॅरेज आहे. गॅरेजमध्ये चार मोटारसायकली दुरुस्तीसाठी आलेल्या होत्या. त्यांचे नंबर बजाज कंपनीची पल्सर मोटारसायकल (MH 14 BH 8509), होंडा कंपनीची एचएफ डिलक्स मोटारसायकल (MH 20 GD5084), बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटारसायकल (MH 20 BX 3726), सुझुकी स्कुटी (MH 20 ES 8562) गॅरेजमध्ये उभ्या केलेल्या होत्या. २६ डिसेंबरला रात्री नेहमीप्रमाणे सातला गॅरेज बंद करून सलमान घरी गेले.

२७ डिसेंबरला पहाटे एकला गॅरेजच्या शेजारी राहणाऱ्या भोलकर यांनी सलमान यांना कॉल करून सांगितले की तुझ्या गॅरेजमधून धूर निघत आहे. तू लवकर ये. त्यानंतर सलमान व त्यांचे वडील नूर शेख गॅरेजकडे धावले. गॅरेजमध्ये आग लागली होती. सलमान यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र शटर उघडले नाही. सकाळी दहाला आग थांबल्यानंतर शटर उघडण्यासाठी गेले असता शटरचे लॉक तुटलेले दिसले. आत प्रवेश केला असता गॅरेजमधील मोटारसायकल दुरुस्तीचे सर्व सामान जळून खाक झाले होते.

गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या दोन मोटर सायकल जळून खाक झाल्या होत्या. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेल्या चार मोटारसायकलींमधून दोनच मोटारसायकलींचा सांगाडा दिसला असता इतर दोन मोटारसायकलींच्या मालकाला कॉल करून विचारले असता त्यांनीही त्या नेल्या नव्हत्या. दोन मोटारसायकल चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. त्यानेच कशानेतरी आग लावली. एकूण ८६ हजार रुपयांचे नुकसान घडवले. पोलिसांनी माथेफिरू चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार अनिल पवार करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात दर मिनिटाला वाढताहेत फ्‍लॅटच्या किंमती

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software