ट्रॅक्टर-टँकर शोधले, चोरट्यांनाही केले गजाआड, छत्रपती संभाजीनगर LCB ची कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नक्षत्रवाडीतून चोरीला गेलेले ट्रॅक्टर-टँकर शोधून काढत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पांडुरंग गोरख दसपुते व विशाल राजगुरू (दोघे रा. छत्रपती संभाजीनगर) व अजय बद्रीनाथ राऊत (रा. उटवद, ता. जि. जालना) अशी संशयितांची नावे आहेत.

चिकलठाणा पोलीस ठाण्यात १ जानेवारीला नितीन रंगनाथ मोरे (वय ३६, रा. कांचननगर नक्षत्रवाडी) यांनी त्यांचे ट्रॅक्टर व टँकर चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हा गुन्हा पांडुरंग दसपुते व विशाल राजगुरू  यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह केला आहे. राजपूत यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचा आदेश सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे यांना दिला. त्यांनी संशयित चोरटे पांडुरंग दसपुते व विशाल राजगुरू यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यांनी साथीदारांसह ट्रॅक्टर-टँकर चोरल्याची कबुली दिली.

त्यांनी हे ट्रॅक्टर हे उटवद (ता. जि. जालना) येथे अजय बद्रीनाथ राऊत (रा. उटवद) यास दिले आहे, तर टँकर सिध्दीविनायकनगर करमाड येथे मोकळ्या जागेत उभे केले आहे. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी जाऊन ट्रॅक्टर व टँकर जप्त केले. असा एकूण ३ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमाल व चोरट्यांना चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, सुधीर मोटे, पोलीस अंमलदार विष्णू गायकवाड, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, महेश बिरुटे, योगेश तरमळे, संजय तांदळे यांनी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत

Latest News

हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत हॉटेल व्यावसायिकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केला राडा!; हॉटेल व्यावसायिकाला चाकू, काठी, लाथाबुक्क्यांनी मारत होती..., हल्ल्यासाठी पुरुष साथीदाराची घेतली मदत
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : एका ३८ वर्षीय महिलेने सिडको बसस्थानकावर केलेल्या राड्याप्रकरणी अखेर गुरुवारी (१२ मार्च) रात्री साडेआठला...
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software