हॉटेलमध्ये जेवण करताना चोरट्यांनी लांबवली बॅग, वेदांतनगर पोलिसांनी १२ तासांत पकडले चोर!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : हॉटेलमध्ये जेवत असतानाच दोन चोरांनी ४२ वर्षीय व्यक्तीची १० हजार रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली. पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोन्ही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून रक्कम जप्त केली. गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. चोरीची घटना रेल्वेस्थानकावरील हॉटेल अशोकामध्ये १८ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता घडली होती.

दिनेश रामपाल डुलगज (वय ३२, रा. छोटा मुरलीधर नगर) आणि नंदू साळूजी नाथभजन (रा. कबीरनगर) अशी संशयित चोरट्यांची नावे असल्याचे वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितले.
नक्की काय घडलं?
मूळचे राजस्थानचे लक्ष्मण घांची (वय ४२) कंपनीच्या कामानिमित्त ७ नोव्हेंबरपासून शहरात होते. १८ नोव्‍हेंबर रोजी मुंबईला जायचे असल्याने रात्री ९ वाजता रेल्वेस्थानकावर आले. जवळच्याच हॉटेल अशोकामध्ये जेवणासाठी गेले असता जेवण सुरू असताना एक जण अचानक त्यांच्याजवळ आला आणि गप्पा मारण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांना बोलण्यात गुंतवून त्याच्या साथीदाराने घांची यांची बॅग लंपास केली.

बॅगमध्ये १० हजार रुपये रोख, महत्त्वाची कागदपत्रे आणि मुलीची शैक्षणिक कागदपत्रे होती. घांची यांनी तातडीने हॉटेलमालकाकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलिसांनी हॉटेलकडे धाव घेतली. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात संशयित दिनेश आणि नंदू कैद झाले होते. पोलिसांनी लगेचच दोघांचा शोध घेऊन उस्मानपुरा परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी बॅग कचऱ्यात फेकून रोख रक्कम काढून घेतली होती. दोघांविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास केला जात आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार मतीन शेख, विलास डोईफोडे आणि मनोज चव्हाण यांनी केली.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software