- News
- सिटी क्राईम
- ‘लोकल’ गुंडाने ज्येष्ठ पत्रकाराच्या अंगावर घातली दुचाकी!, गारखेड्यातील घटनेने टवाळखोरांचा कहर पुन्ह...
‘लोकल’ गुंडाने ज्येष्ठ पत्रकाराच्या अंगावर घातली दुचाकी!, गारखेड्यातील घटनेने टवाळखोरांचा कहर पुन्हा समोर
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ज्येष्ठ पत्रकार शेषराव पठाडे यांच्या अंगावर दुचाकी घालून गुंडाने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या गुंडाने यापूर्वीही एका राजकीय नेत्यावर पिस्तुल रोखले होते. दिवसेंदिवस त्याच्या गुन्हेगारी कारवाया वाढत असूनही, पोलीस त्याला वेसन का घालत नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्तिक राजू लोकल (रा. तिरुपती विहार, गारखेडा परिसर) गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे.
ड्यूटी संपल्यावर श्री. पठाडे हे १९ नोव्हेंबरच्या रात्री ११.१५ वाजता घरी आले. बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये दुचाकी वळवत असताना मागून दुचाकीवर आलेल्या कार्तिकने त्यांच्या अंगावर दुचाकी (क्र. एमएच २० सीएन ०४४७) घालण्याचा प्रयत्न केला. पठाडे यांनी त्याला अंगावर गाडी घालताय का? अशी विचारणा केल्यावर त्याचा संताप अनावर झाला. त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. आरडाओरड ऐकून पठाडे यांच्या पत्नी घरी आल्या. त्या वाद मिटवत असताना कार्तिकने त्यांनाही अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी केली.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
वाळूज महानगरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावले!
By City News Desk
विवाहितेच्या छळप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By City News Desk
Latest News
19 Mar 2026 22:40:50
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...

