तोतया पोलिसाचा कहर : खून झाल्याचे सांगून २ महिलांचे ९ तोळे सोन्याचे दागिने लांबवले!, उस्मानपुऱ्यातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : शहरात पुन्हा एकदा तोतया पोलिसांनी धुमाकूळ माजवला आहे. पदमपुऱ्यात खून झाला असून, आम्ही पोलीस आहोत. तुमचे दागिने पिशवीत काढून ठेवा, असे म्हणत तोतया पोलिसांनी २ महिलांचे ९ तोळे सोन्याचे दागिने हातचलाखीने गायब केले. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील भाजप कार्यालयासमोर ही घटना शुक्रवारी (२६ सप्टेंबर) दुपारी पावणेबाराला घडली. 

मीना प्रदीप सोनी (वय ६५, रा. कोकणवाडी) या मोपेडवरून भाजीपाला घेण्यासाठी भाजप कार्यालयासमोर आल्या होत्या. त्यांना दोघांनी थांबवत पोलीस असल्याची बतावणी करत अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगितले. त्या दागिने काढून ठेवत असताना दोघांनी मदतीच्या बहाण्याने दागिने स्वतःकडे घेत पिशवीत ठेवण्याचे नाटक केले. त्यानंतर पसार झाले. काही वेळाने मीना यांनी पिशवीत दागिने तपासले असता दिसून आले नाहीत. याच पद्धतीने भारती राठोड यांनाही लुटले गेल्याचे समोर आले. दोघींचे मिळून ९ तोळ्यांचे दागिने तोतया पोलिसांनी नेले आहेत. सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही लुटारू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सायंकाळी याप्रकरणी वेदांतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तोतया पोलिसांचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

Latest News

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले... भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software