दाम्पत्य केरळ फिरायला गेले, चोरट्याने घर साफ केले, साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह रोकड केली गायब... जवाहनगर परिसरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : घराला कुलूप लावून दाम्‍पत्‍य केरळ फिरायला गेले असता चोरट्यांनी  संधी साधून अवघे घर साफ केले. सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गगनगिरी हौसिंग सोसायटीत समोर आली आहे.

राजेंद्र गोपाळराव पाटील (वय ५८, गगनगिरी हौसिंग सोसायटी)  यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते कुटुंबासह राहतात. अभियांत्रिकी उपकरणे विकतात. २५ ऑक्‍टोबर रोजी दुपारी १ च्या सुमारास ते घराला कुलूप लावून केरळ येथे फिरण्यासाठी पत्नीसह गेले होते. केरळ फिरून २८ ऑक्‍टोबरला दिनांक सकाळी साडेचारला परतले. त्यांना घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरामधील हॉलचे सर्व दरवाचे व बेडरूमचा दरवाचा उघडा दिसला. बेडरूमधील सर्व साड्या, कपडे व इतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसले. कपाटामधील छोटे लॉकरही उघडे दिसले. त्यात ठेवलेले सोने-चांदीचे दागिने गायब होते. दुसऱ्या कपाटातील रोख रक्कम दिसली नाही. चोरट्याने दागिने व रक्कम चोरून नेल्याचे समोर आले. डीव्हीआरसुध्दा चोरून नेला. चोरट्याने चोरून नेलेल्या ऐवजात १४ ग्रॅम सोन्याची ७५ हजारांची पोत, ५ ग्रॅमची २५ हजारांची अंगठी, १३ ग्रॅम सोन्याची ६२ हजारांची पोत, ७५ ग्रॅम चांदी, २ तोळे २ ग्रॅमचा १ लाख १० हजार रुपयांचा पोहे हार , ३ ग्रॅमचे ६ हजार ७८० रुपयांचे भरीव, ६८ हजार रुपये रोख, ६ हजारांचा डीव्हीआर असा एकूण ३ लाख ६१ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. जवाहरनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...

Latest News

भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले... भाजपची खेळी, इतर पक्षांची बसली दातखिळी!; जिल्ह्यातील ९ पैकी ६ पं.स.चे सभापतिपद केले काबिज, जाणून घेऊ राजकारण कसे रंगले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्‍ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील ९ पैकी ६ पंचायत समित्‍यांवर आपला सभापती बसवून भारतीय जनता पक्षाने...
रिलस्टार अरुण तुपेचा घरातच आढळला मृतदेह!; सोशल मीडियावर दोन लाख फॉलोअर्स, पोस्ट मार्टेमच्या अंतिम अहवालातून समोर येणार कारण, पोलीस काय म्हणाले...
तलावात बुडून ३ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू, सिल्लोड तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर पंचायत समिती सभापतिपदी शिंदे गटाच्या वंदना शिंदे, उपसभापतिपदी शरद पवार गटाच्या सोनाली जाधव
छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software