- News
- सिटी क्राईम
- मध्यवर्ती बसस्थानक बनले गुन्हेगारांचे केंद्र, आता आजी-आजोबाला लुटले, चोरट्याला प्रवाशांनी बेदम चोपले...
मध्यवर्ती बसस्थानक बनले गुन्हेगारांचे केंद्र, आता आजी-आजोबाला लुटले, चोरट्याला प्रवाशांनी बेदम चोपले!; पोलीस चौकीत पोलीसच नव्हते...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : गुन्हेगार आणि गुन्ह्यांचे केंद्र बनलेले मध्यवर्ती बसस्थानक पुन्हा एका घटनेने चर्चेत आले आहे. बसस्थानकात टवाळखोर, चोरटे सर्रास फिरत असतात. ते पोलिसांनाही जुमानत नाहीत. काही दिवसांपूर्वी तर एका टवाळखोराने चक्क पोलिसालाच मारहाण केली होती. आता विकृतीचे टोक गाठत बुधवारी (५ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता एका चोरट्याने देवदर्शनाला निघालेल्या आजी-आजोबाचे ३ हजार रुपये चोरले. आजी-आजोबाने त्याला पकडले. त्यामुळे त्याने लगेचच ते पैसे दुसऱ्या साथीदाराकडे दिले आणि तो साथीदार पसार झाला. पकडलेला चोरट्याला अन्य प्रवाशांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
मध्यवर्ती बसस्थानकात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटना वाढल्या आहेत. चोऱ्या, हाणामाऱ्या सर्रास होतात. टवाळखोर महिला, मुलींची छेड काढत असतात. काही दिवसांपूर्वी एका पोलिसालाच टवाळखोराने बेदम मारहाण केली होती. प्रवाशांसाठी बसस्थानक असुरक्षित बनले आहेत. अशा स्थितीत पोलीस गस्त बसस्थानकात वाढविण्याची गरज आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
चंद्रकांत खैरेंना नेते मानण्यास रशीद मामूंचा नकार! (व्हिडीओसह)
By City News Desk
Latest News
17 Jan 2026 22:13:45
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विधवा महिलेचे डोक्याचे केस धरून ओढत, धक्काबुक्की करून युवकाने तिची सोन्याची पोत घेऊन पळ...

