साताऱ्याचा लाचखोर ग्राम महसूल अधिकारी मधुकर थोरात  ACB च्या जाळ्यात!; खासगी एजंटही ताब्‍यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लाचखोर ग्राम महसूल अधिकारी मधुकर आसाराम थोरात (वय ५०, रा. कळकी, कन्नड) आणि त्‍याचा खासगी एजंट कैलास प्रभाकर साळुंखे (वय ३९, रा. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा तलाठी कार्यालयात मंगळवारी (१६ सप्‍टेंबर) दुपारी साडेबाराला ही कारवाई करण्यात आली. नुकत्याच खरेदी केलेल्या प्लॉटचा फेर करून सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी त्‍यांनी लाच घेतली.

एका नागरिकाने मार्च २०२५ मध्ये सातारा परिसरात प्लॉट खरेदी केला होता. या प्लॉटचा फेर करून सातबाऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी २१ ऑगस्टला त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज दिला. मात्र, लाचखोर मधुकर थोरातने त्यांना आधी चकरा मारायला लावल्या. नागरिकाने थोरात यांना याबद्दल विचारले असता त्याने एजंट कैलास साळुंखेला भेटायला सांगितले. साळुंखेने त्यांच्या कामाचा ७ हजार रुपये दर असल्याचे सांगितले. पैशांमुळे इतके दिवस चकरा मारायला लावल्याचा राग आल्याने नागरिकाने सरळ एसीबीला (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कळवले.

पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी त्‍यांची तक्रार ऐकून घेत पोलीस निरीक्षक वाल्मीक कोरे, योगेश शिंदे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. पथकाने लाचेच्या मागणीची खातरजमा केली. नंतर मंगळवारी दुपारी १२:३० वाजता सातारा तलाठी कार्यालयातच सापळा रचला. तडजोडीअंती साळुंखेने ७ ऐवजी ५ हजार घेण्याची तयारी दर्शवली. थोरात, साळुंखे यांनी पैसे स्वीकारताच दुचाकीची चावी हाताच्या बोटात फिरवण्याचा इशारा ठरला होता.

दोघांनी नागरिकाला कारमध्ये बसवून पैसे घेतले. नागरिकाने कारमधून उतरताच बोटांत चावी फिरवली अन्‌ दबा धरून बसलेल्या पथकाने लाचखोरांवर हल्लाबोल केला. पोलीस अंमलदार राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे, अन्वर शेख यांनी दोन्ही लाचखोरांच्या मुसक्या आवळल्‍या. त्यांच्याविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचखोर थोरातला २०२४ मध्ये फुलंब्री तालुक्‍यातून उत्कृष्ठ तलाठी म्‍हणून पुरस्कार मिळाला होता, हे विशेष.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software