मोठी बातमी : ACB च्या जाळ्यात अडकलेच नाही उच्च शिक्षण कार्यालयातील ‘बडे सावज’!; पण लाचेची मागणी स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभागात खळबळ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर उच्चशिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी संजय मार्तंड जगताप यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा वेदांतनगर पोलिसांनी दाखल केला आहे. त्यांनी बीडच्या शिरूर कासार येथील प्राध्यापकाकडे वेतन निश्चितीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, पण संशय आल्याने जगताप यांनी लाच स्वीकारली नाही. त्यानंतर वैद्यकीय रजा घेऊन अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी हालचाली सुरू केल्या. प्राध्यापकानेही नंतर तक्रार पुढे नेण्याची भूमिका न घेतल्याने अखेर एसीबीने पुढे येऊन जगतापविरुद्ध तक्रार दिली. या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

बीडच्या ‘एसीबी’चे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संजय जगताप याने स्वतःसाठी आणि वरिष्ठांसाठी लाचेची मागणी केली होती. वेतन निश्चिती प्रस्ताव जगताप हा १५ ते २० रुपये घेतल्याशिवाय मंजूर करत नाही, अशी तक्रार प्राध्यापकाने केली होती. प्राध्यापकासह आणखी तिघांचे वेतन निश्चिती प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जगतापने एकूण ४५ हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर तडजोडीत ३० हजार रुपये स्वीकारण्याचे त्याने मान्य केले. मात्र लाचेच्या मागणीच्या पडताळणीवेळी जगतापला संशय आला. त्यामुळे त्याने लाच स्वीकारली नाही. तो पैसे न स्वीकारताच निघून गेला. पुन्हा सापळा रचूनही तो अडकला नाही. नंतर त्याने प्राध्यापकासह तिघांचे काम पैसे न घेताच करून दिले. वैद्यकीय रजा टाकून गायब झाला. त्याचा मोबाइलही बंद येत असून, त्याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचे कळल्यानंतर एसीबीकडून स्वतःहून वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software