मोपेडची डिक्की तोडून बिल्डरचे २.८७ लाख घेऊन चोरटे भुर्रर्र..., क्रांती चौकातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मोपेडच्या डिक्कीतून २ लाख ८५ हजार रुपये ठेवलेली पिशवी युनिकॉर्न दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लंपास केली. ही खळबळजनक घटना क्रांतीचौकातील किंग्स मोटार्स दालनासमोर गुरुवारी (२ ऑक्टोबर) सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान घडली. शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

कपिल दिलीप खंडागळे (वय २८, रा. हायकोर्ट कॉलनी, सातारा) हे बांधकाम व्यावसायिक असून, कार विकत घेण्यासाठी पहायला शोरूमध्ये आले होते. पार्किंगमध्ये त्यांनी मोपेड दुचाकी उभी केली. काही वेळातच दुचाकीवरून दोघांनी डिक्की उघडून त्यातील रोख रकमेची पिशवी उचलली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी चोरांकडे धाव घेतली. मात्र चोरांनी लगेचच त्यांच्या युनिकॉर्न दुचाकीवरून पळ काढला. या झटापटीत कर्मचाऱ्यांच्या हाती चोरांच्या दुचाकीचे मडगार्डच लागले. उस्मानपुरा पोलिसांना कळवताच पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक हेमंत सुपेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत

Latest News

छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती निवडणुकीत अंबादास दानवेंचा राडा, तरीही भाजपने फडकवला भगवा!; भाजप उमेदवाराची कॉलर पकडून माजवली दहशत
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतली आहे. भाजपचे कल्याण गायकवाड ९...
गंगापूर पंचायत पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात आ. बंब यांना यश, सभापतिपदी भाजपच्या कविता चव्हाण, शिंदे गटाचे हिवाळे उपसभापतिपदी बिनविरोध
सिल्लोडच्या पंचायत समितीवर भाजपचा झेंडा!; सभापतिपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर
पोलिसांत साक्ष दिली म्हणून टवाळखोरांनी तरुणावर लोखंडी रॉडने चढवला हल्ला!; राजनगरातील घटना 
शू रॅकमध्ये फ्‍लॅटची चावी ठेवणे पडले महागात, १ लाख ८० हजारांच्या साहित्यावर चोरट्याचा डल्ला!; सुराणानगरातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software