साजापूरच्या भंगार गोडावूनला आग लागली की लावली?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर शिवारातील रॉयल एंटरप्रायजेस या भंगार गोडावूनला आग लागली. यात सुमारे १८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी (२५ सप्टेंबर) पहाटे पावणेतीनला घडली. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) या घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

साजापूर येथे गट क्र. ५९ मध्ये आफताब खान यांचे रॉयल एंटरप्राईजेस नावाने भंगारचे गोडावून आहे. ते बुधवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे गोडावून बंद करून घरी गेले. गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास गोडावूनमधील कामगार राजेंद्र गौतम यांनी कॉल करून त्यांना आग लागल्याचे सांगितले. अग्‍निशमन दलाने आग आटोक्‍यात आणली. आफताब यांनी पोलिसांना सांगितले, की गोडावूनसमोरील सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक अनोळखी व्यक्ती आगीतून पळताना दिसून आला असून, ही आग कोणीतरी जाणीवपूर्वक लावल्याचा त्यांनी संशय व्यक्त केला आहे. आगीत २४ टन प्लास्टिक स्क्रॅप, २.५ टन ॲल्युमिनियम स्क्रॅप व इतर भंगार असे मिळून सुमारे १८ लाखांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ

Latest News

मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ मित्राच्या घरात आढळला युवकाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह, बिडकीनजवळील घटनेने खळबळ
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पैठणखेडा येथे ४० वर्षीय युवकाचा मृतदेह त्याच्या शेजारी...
छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software