सिडको वाळूज महानगरात रो-हाऊसला आग; ७ लाखांच्या नुकसानीचा अंदाज

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रो हाऊसला आग लागून घरातील साहित्य खाक झाले. अंदाजे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज, २४ नोव्‍हेंबरला दुपारी पावणेदोनच्या सुमारास सिडको वाळूज महानगरातील पाण्याच्या टाकीजवळील प्रकाश जाधव यांच्या रो-हाऊसमध्ये घडली.

गॅस सिलिंडरच्या व्हॉल्व्हमधून लिकेज झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सिलिंडर पूर्ण रिकामे होईपर्यंत खबरदारी म्हणून काही काळ थांबावे लागल्याने आग वाढत गेली. सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या वेळी उप अग्निशमन अधिकारी अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फायर लिडर एल. जी. ब्रह्मणकर, आर. के. जाट, एस. बी. सोनवणे, डी. पी. पाटील, टी. बी. तांदळे, पी. डी. घुगे आदी कर्मचाऱ्यांनी तत्परतेने कारवाई करून मोठा अनर्थ टाळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत किचन व इतर घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software