आपली प्रेयसी मित्राच्या बाहुपाशात पाहताच संताप अनावर, लाकडी दांड्याने डोके ठेचून हत्या!‌, छत्रपती संभाजीनगरच्या काबरानगरातील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : मित्राला आपल्या प्रेयसीसोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे संताप अनावर होऊन मित्राने मित्राची लाकडी दांड्याने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काबरानगरात मंगळवारी (३ नोव्हेंबर) पहाटे एकच्या सुमारास घडली.

विशाल बंडू पाचकोर (वय ३२, रा. काबरानगर) असे हत्या झालेल्याचे नाव असून, सुधाकर शेषराव ढेपे (वय ४८, रा. काबरानगर) असे संशयिताचे नाव आहे. ढेपेसह मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला आणि ढेपेच्या प्रेयसीला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. विशाल मूळचा हिंगोली असून, तो शहरात कामासाठी आला आहे. सुधाकर रंगकाम करतो. तीन वर्षांपूर्वी विशाल आणि सुधाकरची ओळख झाली.

सुधाकर एकटा राहतो. सोमवारी (३ नोव्‍हेंबर) रात्री सुधाकरने प्रेयसीला घरी बोलावले होते. प्रेयसी आणि तो घरी असताना रात्री ११ ला विशाल त्यांच्याकडे आला. दोघांसाठी दारू आणायला सुधाकर बाहेर गेला. तो दारू घेऊन येईपर्यंत विशाल आणि सुधाकरची प्रेयसी अश्लील चाळ्यांत लिप्त झाले. मंगळवारी पहाटे १ ला सुधाकर घरी आला. त्याने विशाल व प्रेयसीला नको त्या अवस्थेत पाहिले. त्यामुळे त्याचा संताप अनावर झाला. त्याने घरातील लाकडी दांड्याने विशालच्या डोके, छातीवर जोरदार प्रहार केले. विशाल गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. त्यानंतर सुधाकरने एका अल्पवयीन मुलाला बोलावून घेत मैत्रिणीच्या मदतीने विशालला रस्त्यावर ओढत आणून फेकले. पहाटे दोनला रस्त्यात विशाल रक्तबंबाळ होऊन पडलेला पाहून नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेतून त्याला घाटी रुग्णालयात नेले.

जवाहरनगर पोलिसांनाही कळविण्यात आले. जवाहरनगर पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. डोक्यात मारल्याच्या आणि अंगावर जखमा असल्याने खुनाचा संशय बळावला. सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात तिघे जण विशालचा मृतदेह ओढत रस्त्याने आणताना दिसले. त्यातील एक सुधाकर असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी सुधाकरचे घर गाठले. सुधाकर व त्याची प्रेयसी घरातच होते. फरशी पुसलेली होती. रक्त पुसलेला कपडाही आढळला. दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. या प्रकरणात पोलीसच फिर्यादी झाले असून, अंमलदार विनोद बनकर यांच्या तक्रारीवरून सुधाकर, त्याची प्रेयसी आणि अल्पवयीन मुलाविरुद्ध खून आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल एकटाच शहरात राहत होता. त्याच्याकडे मोबाइलही पोलिसांना मिळून आला नाही. रात्री उशिरा त्याचे नातेवाइक छत्रपती संभाजीनगरला आले. 

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software