नाव कडूबाई, वय ७०, धंदा सेक्स रॅकेट...धंद्याचा ‘पत्ता’च आता पोलिसांनी केला गायब!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाव कडूबाई भिकन पवार, वय ७०, रा. पंढरपूर वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर... व्यवसाय सेक्स रॅकेट चालवणे, पोलिसांनी पकडले की परत धंदा सुरू करणे, विशेष म्हणजे, एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा कुंटणखाना चालवताना पोलिसांनी पकडल्याने तिचा ‘व्यवसाय पत्ताच’ आता पोलिसांनी गायब केला आहे. ती वारंवार वाळूज एमआयडीसी लगतच्या तिसगाव परिसरातील खवड्या डोंगराजवळ निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये सेक्स रॅकेट चालवत होती. गुरुवारी (२५ डिसेंबर) पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने या कुंटणखान्यावर बुलडोझर चालवला.

कोण आहे कडूबाई?
कडूबाई सुरुवातीला पकडली गेली ती ८ जुलै २०२५ रोजी. याच निळ्या पत्र्याच्या शेडमध्ये तिने कुंटणखाना सुरू केला. एक कमळापूर आणि दुसरी पंढरपूर अशा दोन महिलांकडून ती वेश्या व्यवसाय करवून घ्यायची. ग्राहकाकडून ५०० रुपये घेतल्यानंतर २०० रुपयेच महिलांना द्यायची. या महिला घरी कंपनीत कामाला जाते, असे सांगून देहविक्री करण्यासाठी येत होत्या. शेडमध्ये एकूण ४ खोल्या. समोरील खोलीत कडूबाई बसून गिऱ्हाईकांशी आधी चर्चा करायची. मग महिलांना बोलावून पसंत करायला सांगायची. मग महिलेला इशारा करून त्याच्यासोबत खोलीत जायला सांगायची. जिथे शरीरसंबंध प्रस्थापित केले जायचे, त्या दोन्ही खोल्यांना कापडी पडदे लावलेले होते. दुसरी कारवाई आता पोलिसांनी कडूबाईवर केली ती २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री. यावेळी तिने ३ महिला सेक्स रॅकेटमध्ये ढकलल्याचे समोर आले. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या पथकाने छापा मारून या महिलांची सुटका केली. 

गरीब महिलांना ओढते जाळ्यात...
कडूबाई गरीब महिलांना जाळ्यात ओढते. त्यांना कमी वेळात जास्त पैशाचे आमिष दाखवून देहविक्रीसाठी प्रवृत्त करायची. ग्राहकाकडून ५०० रुपये घेतल्यावर महिलेला मात्र २०० रुपयेच द्यायची. ३०० रुपये तिचे जागा कमिशन असायचे. २२ डिसेंबरला पकडलेल्या महिलांपैकी दोघी वाळूज एमआयडीसी तर एक मुकुंदवाडीची निघाली. त्यामुळे ती शहरभर रॅकेट चालवते का, असाही प्रश्न निर्माण होतो. एकदा कारवाई केल्यावरही तिने त्याच ठिकाणी पुन्हा कुंटणखाना सुरू केला. यावरून ती पोलिसांनाही जुमानत नसल्याचे दिसून येते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software