मिसारवाडीत युवकावर खुनी हल्ला, दोघांचे चाकूने सपासप वार

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३२ वर्षीय युवकावर चाकूने सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिडको पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सोमवारी २२ डिसेंबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मिसारवाडीत घडली.

सचिन भास्कर धोत्रे (वय ३२, रा. सावित्रीनगर महादेव मंदिरामागे चिकलठाणा) यांच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून, सिडको पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला. जबाबानुसार, ते आई- वडील पत्नी व दोन मुलांसह राहतात. ते सिक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते सावित्रीनगर चिकलठाणा येथून मोटारसायकलीवर बसून त्यांच्या ९ वर्षीय मुलीला आणायला सासरवाडीत मिसारवाडी गल्ली नं. ८ येथे आले.

सासरवाडीत घरासमोर मोटारसायकल उभी करून घरात जात असताना तेथे उभा असलेल्या सतिश साळवे व त्याच्या सोबतच्या त्याच्या मित्राने आवाज दिला व धमकावले. दोघांनी शिवीगाळ करून हाताचापटाने सचिन यांना मारहाण केली. आता याला सोडायचे नाही, याला जीवे मारून टाकू, असे म्हणून सतिशने धारदार चाकूने उजव्या बाजूला पोटावर दोन ठिकाणी व डाव्या बाजूने एक ठिकाणी मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर सचिनच्या सालीने डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना बोलावून घेतले. तेव्हा ते दोघे पळून गेले. पोलिसांनी सचिनला घाटी रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक हरिदास मैदाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software