पोलीस पतीची पत्नीला लाकडी दांड्याने बेदम मारहाण, मिसारवाडी भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पोलीस पतीने पत्नीला क्षुल्लक कारणावरून लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून जखमी केले. घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यात आले. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी या पोलिसाविरुद्ध शुक्रवारी (२१ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल केला आहे.

मिसारवाडी भागात राहणाऱ्या २९ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. गुरुवारी (२० नोव्‍हेंबर) महिलेचे पती घरी आले आणि कार रस्त्यातच उभी केली. ती बाजूला लावा, असे सांगायला पत्नी गेली असता, मी पोलीस आहे. माझे कोणी वाकडे करू शकत नाही. तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर राहा. नाहीतर येथून निघून जा, तू सांगणारी कोण, असे म्हणून पतीने त्यांच्यासोबत वाद घातला. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी हाता-चापटाने व किचनमध्ये ठेवलेल्या लाकडी दांड्याने मारहाण केली.

यात महिला जखमी झाली. जीवे मारण्याची धमकीही पतीने दिले. महिलेने हेल्पलाइन ११२ वर कॉल केल्यानंतर सिडको पोलीस तातडीने घटनास्‍थळी धावले. पोलिसांसह महिलेचे नंदोई त्याला समजावून सांगत असताना तो कोणाचेही ऐकून घेत नव्हता, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या लहान बहिणीने आईला कॉल करून सांगितल्यानंतर महिलेचे आई, भाऊ आणि बहीण घरी आले. त्यानंतर महिलेने सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पतीच्या मारहाणीत जखमी झाल्याने घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यात आले. अधिक तपास पोलीस अंमलदार कृष्णा बोऱ्हाडे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले... छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software