मंगळसूत्र चोरटे क्रूरपणावर उतरले!; मंगळसूत्र ओढले, मानेला हिसका बसून महिला खाली पडून गंभीर जखमी, जय विश्वभारती कॉलनीतील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सध्या शहरात मंगळसूत्र चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. एकटी दुकटी महिला दिसली की, मंगळसूत्र हिसकावून काही क्षणांत गायब होतात. आता तर त्यांचा क्रूरपणा समोर आला आहे. एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र त्यांनी ओढले. पण ते न तुटल्याने हिसका बसून त्या खाली पडून गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (४ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास जय विश्वभारती कॉलनीत घडली.

स्वरुपा प्रकाश वेरूळकर (वय ६३, रा. जयविश्वभारती कॉलनी) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्यांचा मुलगा प्रतीक प्रकाश वेरूळकर (४३, रा. जयविश्वभारती कॉलनी) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून २ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, स्वरुपा वेरूळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याचे नव्हते.

त्या उल्कानगरीतील ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होत्या. रात्री ८ ते ८.३० दरम्यान श्रीराम मंदिर रोडवरील कमानीजवळून जात असताना चेतक घोड्याकडे जाणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मंगळसूत्र तुटले नाही, पण स्वरुपा वेरूळकर यांच्या मानेला झटका बसून त्या पडल्या. त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. आरडाओरड ऐकून नागरिक धावले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले. वाढत्या मंगळसूत्र चोरीच्या घटनांकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software