दोघा भावांचा महिलेवर बलात्कार, उसने दिलेले पैसे परत मागायला घरी आल्याने बेदम मारहाण, किराडपुऱ्यातील घटना, १३ जणांविरुद्ध ‘ॲट्रॉसिटी’सह गंभीर गुन्हे दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पतीपासून विभक्‍त राहत असलेल्या ३८ वर्षीय महिलेसोबत विशिष्ट धर्मातील प्रियकराने लग्‍नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. त्याच्या भावानेही तिच्यावर बलात्कार केला. उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी महिला प्रियकराच्या घरी गेली असता प्रियकरासह मिळून १३ जणांनी मिळून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेप्रकरणी मंगळवारी (२३ डिसेंबर) जिन्सी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिला गादिया विहार रोड भागात राहते. तिच्या तक्रारीनुसार, तिचा  पहिला विवाह २००० मध्ये झाला होता. पती सोबत घरगुती कारणावरून नेहमी भांडण होत होते. सालेमच्या (नाव बदलले आहे) सांगण्यावरून तिने २०२२ मध्ये फारकत घेतली आहे. २०२० मध्ये कामानिमित्त न्यायालयात गेली असता तिथे सालेमची भेट झाली होती. पती व तिच्या भांडणाचा फायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याचा भाऊ शाहरुखनेही (नाव बदलले आहे) तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यावरून १७ सप्‍टेंबर २०२५ रोजी महिलेने दोघांविरुध्द जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

सालेमला दिलेले पैसे परत मागण्यासाठी ती त्याच्या घरी किराडपुऱ्यात गेली असता त्याची पत्नी, आई व अन्य नातेवाइकांसह १३ जणांनी मिळून तिला शिवीगाळ केली. सालेमच्या पत्नीने महिलेच्या डाव्या हाताला कैची मारली. अन्य नातेवाइक महिलांनी लाकडी दांड्याने मारहाण केली. महिलेच्या डोळ्यांत मिरची टाकून हाताचापटाने मारहाण केली. त्यानंतर सर्वांनी महिलेला जातिवाचक शिवीगाळ केली. त्याचवेळी तिथे पोलीस आले. त्यांनी महिलेला जिन्सी पोलीस ठाण्यात आणले. ही घटना घडली होती, ४ मार्च २०२४ रोजी, म्हणजे गेल्यावर्षी. त्यावेळी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्धच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. इतरांविरुद्ध कोणतीच कारवाई झाली नव्हती. या प्रकरणात मंगळवारी (२३ डिसेंबर) पोलिसांनी महिलेला बोलावून घेतले. त्यानंतर पुन्हा तक्रार घेऊन १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस आयुक्‍त मनोज पगारे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू

Latest News

दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू दुर्दैवी घटना : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदापात्रात बुडून वारकऱ्याचा मृत्यू
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : नाथषष्ठी सोहळ्यादरम्यान गोदावरी पात्रात स्नानासाठी उतरलेल्या ६० वर्षीय वारकऱ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू...
महिलेची हत्या करून पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर पकडले!
महंत रामगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याविरुद्ध गंगापूरमध्ये गुन्हा दाखल
विश्लेषण : अंबादास दानवेंची ‘दादा’गिरी चुकीचीच!; उमेदवार निवडून आणता येत नाहीत, जे निवडून आले त्यांना सांभाळता येत नाहीत मग दुसऱ्यावर त्रागा करून उपयोग काय?
आरटीओ कार्यालयातच भीषण दुर्घटना : चालकाने ट्रक मागे घेताना निष्काळजीपणा केला अन्‌ एजंटचा चाकाखाली येऊन मृत्यू!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software