मुकुंदवाडीच्या राजनगर भागातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मुकुंदवाडीच्या राजनगर भागातून १५ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना समोर आली आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुलीच्या आत्याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची अल्पवयीन भाची आठ महिन्यांपासून त्यांच्याकडे राहण्यास आली होती. तिला त्यांनी शिवणक्लास लावून दिला होता. तिचे गणेशसोबत (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) प्रेमसंबंध होते. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला बहिणीकडे राहण्यास पाठविले होते. मंगळवारी (२२ डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुलगी आजीकडे जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडली. ती नेहमी आजीकडे गावी जायची. त्यामुळे तिच्या आत्याने आईला रात्री ८ वाजता कॉल केला, की मुलगी गावी आली का, त्यांनी नाही सांगितले. त्यामुळे मुलीचा नातेवाइक, मैत्रिणींकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. तिचे अपहरण झाल्याची खात्री पटल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. मुलगी आठवीत शिकत होती.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software