जलील यांनी धुडकावली पोलिसांची नोटीस!; म्हणाले, खोटे गुन्हे तुम्‍ही दाखल केले, तुम्‍ही गुन्हा केला!!; पालकमंत्र्यांच्या दबावाखाली राहून माझ्यावर दबाव आणू नका...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरुद्ध दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्‍यांना २२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहून जामीन घेण्यासाठी सहायक पोलीस आयुक्‍त संपतराव शिंदे यांनी नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळताच जलील हे संतापले असून, त्‍यांनी ही नोटीस धुडकावून लावून मी असे न्यायालयात जाऊन जामीन घेणार नाही, असे पोलिसांना निःक्षून सांगितले. खोटे गुन्हे तुम्‍ही दाखल केले, ते करून गुन्हा तुम्‍ही केला आहे. पालकमंत्र्यांच्या सांगण्यावरून पोलीस असे वागत असून, याची पोलीस महासंचालकांनी चौकशी केली तर हे अधिकारी घरी जातील, असे जलील म्हणाले. माझा आवाज गप्प करण्यासाठी हा सर्व प्रकार सुरू आहे. मात्र मी गप्प बसणार नाही, असे जलील म्हणाले.

काय आहे प्रकरण... ?
जो शब्‍द यूपी, हरियाणामध्ये शुद्रांसाठी वापरला जातो, तो शब्‍द जाणीवपूर्वक मंत्री संजय शिरसाट आणि आमच्या समाजासाठी वापरल्याची तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे मराठवाडा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण सुदामराव हिवराळे (वय ४६, रा. क्रांतीनगर, जिल्हा सत्र न्यायालयामागे, छत्रपती संभाजीनगर) यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात केली होती. त्यावरून पोलिसांनी १२ जूनला जलील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. तक्रारीत म्हटले होते, की मंत्री शिरसाट आणि ते एकाच जातीचे असून, शिरसाट यांचा आमच्या जातीत खूप आदर केला जातो. ११ जूनला दुपारी ३ ते ५ या वेळेत इम्तियाज जलील सय्यद अब्दुल जलील (रा. मन्नत, हडको, छत्रपती संभाजीनगर) जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी खासदार आहेत, ते मुस्लिम धर्माचे असून त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर पत्रकार परिषद घेऊन ज्‍या जातीचा उल्लेख केला, तशी कोणती जात नाही. शासनाकडून देण्यात येणारी जागा आमच्या जातीचा उल्लेख करून इनामी वतन असा शब्दप्रयोग करून दिली आहे. स्वातंत्र्यापूर्वी वर्ण व्यवस्थेच्या काळात जे मनुस्मृतीनुसार चार वर्णभेद करण्यात आले होते, त्यापैकी शेवटचा वर्ण म्हणजे शुद्र असा उल्लेख होतो. शुद्र म्हणजे अतिशय हलका, कुचकामी व निरुपयोगी असा त्याचा अर्थ होतो. जलील यांनी जो शब्द वापरला तो उत्तरप्रदेश, हरियाणामध्ये शुद्रांसाठी प्रचलित आहे. इम्तियाज जलील यांनी पालक मंत्री संजय शिरसाठ यांचा किंवा आमच्या जातीच्या लोकांबद्दल जाणीवपूर्वक, हेतूपूर्वक व जातीला अपमानित करण्याच्या उ‌द्देशाने आक्षेपार्ह शब्दप्रयोग ६ ते ७ वेळेस केलेला आहे, असे हिवराळे यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्‍त संपतराव शिंदे करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software