जिल्हा कोर्टात राडा!; सरकारी वकिलाला बुटाने मारले, गळा दाबला, रॉकेल टाकून जीवंत जाळण्याची धमकी!!, नक्की काय घडलं, ॲड. देशपांडेंनी पोलीस तक्रारीत सांगितलं...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : सर्वोच्‍च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयात वकिलांनी सोमवारी (१३ ऑक्‍टोबर) लेखणी बंद आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान सरकारी वकिलांनी काळी फित न लावल्याचा राग एका वकिलाला इतका आला, की दुसऱ्या दिवशी न्यायालयातच त्‍याने सरकारी वकील ॲड. अविनाश देशपांडे यांना बुटाने मारले. चापटबुक्क्याने मारहाण केली. दोन्ही हातांनी गळा दाबला. तू बाहेर ये तुला रॉकेल टाकून जीवंत मारून टाकतो, अशी धमकीही दिली. हा धक्कादायक प्रकार जिल्हा न्यायालयात मंगळवारी (१४ ऑक्‍टोबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. वेदांतनगर पोलिसांनी ॲड. देशपांडे यांच्या तक्रारीवरून आज, १५ ऑक्‍टोबरला पहाटे तीनच्या सुमारास ॲड. मनोहर रामदास लोखंडे (रा. कोकणवाडी, आरसीसी क्लाससमोर, छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ॲड. अविनाश सूर्यकांतराव देशपांडे (वय ५९, रा. शारदाश्रम कॉलनी, पैठणगेट, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ३५ वर्षांपासून ते जिल्हा न्यायालयात वकिली करतात आणि ८ वर्षांपासून जिल्हा न्यायालयात सरकारी वकील आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ॲड. देशपांडे हे जिल्हा व सत्र न्यायालयातील इमारतीमधील त्यांच्या दालनात काम करत असताना ॲड. मनोहर लोखंडे हा त्यांच्या कक्षात आला. ॲड. देशपांडे यांना म्हणाला, की काल, १३ ऑक्‍टोबरला जिल्हा न्यायालयात लेखणी बंद आंदोलन करत असताना तुम्ही काळी फित का लावली नाही? ॲड. देशपांडे यांनी त्याला समजाविण्याचा प्रयत्‍न केला असता तो देशपांडे यांच्या अंगावर धावून आला.

पायातील बूट काढून देशपांडे यांच्या कपाळ, डोक्यावर, उजव्या खांद्यावर मारला. अंगातील कोट ओढून झटापट केली. त्यामुळे कोटचे बटन तुटले. शिवीगाळ करुन चापटाने बुक्क्याने पोटावर व इतर ठिकाणी मारहाण केली. दोन्ही हाताने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शिपाई कृष्णा वालतुरे यांनी मनोहरला बाजूला केले. आरडाओरड ऐकून कोर्ट पैरवी अधिकारी सुनील ढेरे धावत आले. ते भांडण सोडवून ॲड. मनोहरला देशपांडे यांच्या कक्षातून बाहेर नेत असतानादेखील त्याने शिवीगाळ करून तू बाहेर ये तुला रॉकेल टाकून जीवंत मारून टाकतो, अशी धमकी दिली. कार्यालयातील कर्मचारी भास्कर जायभाय, अमित जोशी, अविनाश शिंदे यांनीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. अखेर ॲड. देशपांडे यांनी पोलिसांची मदत मागितली.

पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर मुख्य जिल्हा न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन ॲड. देशपांडे वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. पोलीस ठाण्यातही मनोहर लोखंडे आला. त्याने पुन्हा ॲड. देशपांडे यांना शिवीगाळ करून त्यांच्याविरुध्द अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. रात्री ८ वाजेपासून वेदांतनगर पोलीस ठाण्यातील वीज गुल असल्याने गुन्हा दाखल करण्यास आज पहाटेचे तीन वाजले. पोलिसांनी मनोहर लोखंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ॲड. देशपांडे यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software