गुलमंडी भागात माजी आमदाराच्या भावाच्या जुगार अड्ड्यावर छापा, एका महिलेसह १४ जण पकडले

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहराच्या मध्य वस्तीत गुलमंडी भागातील जुगार अड्ड्यावर सिटी चौक पोलिसांनी शनिवारी (२१ डिसेंबर) रात्री आठला छापा मारला. जुगार खेळताना एका महिलेसह १४ जणांना ताब्यात घेतले असून, १ लाख ६४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेतलेल्यांत चालक व मालक विष्णू लेखराज तनवाणी याचा समावेश आहे. तो एका माजी आमदाराचा भाऊ आहे. याच जुगार अड्ड्यावर जुलैमध्येही पोलिसांनी छापा मारून २३ जण पकडले होते. राजकीय वरदहस्त असल्याने तनवाणी हा पुन्हा पुन्हा जुगार अड्डा सुरू करतो, असे या कारवाईतून दिसून येते.

तनवाणीच्या मालकीच्या दादा डोसा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर व सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी चौक पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी या जुगार अड्ड्यावर हल्लाबोल केला. कारवाईत पोलिसांनी जुगारचालक विष्णू तनवाणी (६२, रा. गुलमंडी) याच्यासह सुनीता सुनील दाभाडे (वय ४०, रा. बेगमपुरा), दिगंबर वालडे (वय ४२, रा. खडकेश्वर मंदिराजवळ उदय कॉलनी), संजय सदाशिवराव भैरव (वय ६०, रा. गुलमंडी केळीबाजार), शेख नदीम शेख रहीम (वय ४५, रा. पैठण गेट, दलालवाडी), महेश गणेशलालजी जैन (वय ५०, शहागंज, गांधी पुतळ्याच्या बाजूला), किशोर मोहनराव शेजवळ (वय ३०, रा. प्रगती कॉलनी, घाटी परिसर, गौतमनगर), सुरेश जगन्नाथ जाधव (वय ४१, रा. थत्ते हौदाजवळ, बेगमपुरा), विष्णू बळवंत गायकवाड (वय ४५, रा. थत्ते हौदाजवळ, बेगमपुरा), सूरज गौतम जावळे (वय २५, रा. थत्ते हौदाजवळ, बेगमपुरा), राजू सांडू जैस्वाल (वय ५५, रा. बीड बायपास खडी रोड), गौतम गोपाळा गवई (वय ५०, नंदनवन कॉलनी), अनिल सोमीनाथ वाहूळ (वय ४३, रा. भोईवाडा), नवीन श्यामलाल बंगारकर (वय २९, रा. लेबर कॉलनी) यांना ताब्यात घेतले.

जुगाराचे साहित्य, विविध कंपन्यांचे महागडे मोबाइल आणि ५७ हजार ५१० रुपयांची रोकड असा १ लाख ६४ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सिटी चौक ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुनीर पठाण,  पोलीस अंमलदार इरफान खान, घोडके, टेकले, त्रिभुवन, पंडित, वाहूळ, जारवाल व पाटील यांच्या पथकाने केली.
पोलिसांकडे कबुली...
पोलिसांनी तनवाणीकडे क्लब चालविण्याचा परवाना मागितला असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. ही सर्व जागा माझ्या मालकीची असून, मीच हा क्लब चालवत असल्याची कबुली दिली. सर्व जुगारी झन्नामन्ना नावाचा जुगार या ठिकाणी गोलाकार टेबलवर बसून खेळत होते. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software