छत्रपती संभाजीनगरात ३ तास, वाहतूक नियम मोडणाऱ्यांची नुसती भागम्‌भाग...४१२ राँग साइड, १६४ ट्रिपल सीट जाणारे पकडले!; भक्कम दंड ठोठावला!!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : तारिख आजची ३ नोव्हेंबर, वेळ सकाळी ११ ते दुपारी २... एकाचवेळी शहर वाहतूक शाखेच्या शहरातील पाचही विभागांनी रस्त्यावर धाव घेतली... मग सुरू झाली भागम्‌भाग... वाहतूक नियम मोडणाऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस रस्त्यावर उतरल्याचे पाहून धसका घेतला... गल्लीबोळातून धूम ठोकली... जे हाती लागले त्यांच्याकडून भक्‍कम दंड वसूल करण्यात आला. अवघ्या ३ तासांत ४१२ राँग साइड, १६४ ट्रिपल सीट जाणारे पकडण्यात आले.

शहरात वाहनांची वाढती संख्या, त्यातच वाहनधारकांची बेशिस्तपणे वाहन चालविण्याची वृत्ती यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांवरही ताण येतो. बेशिस्त व नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी आज विशेष मोहीम राबविण्यात आली. एकूण ५७६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या (राँग साईड) ४१२ वाहन चालकांवर कारवाई करून २ लाख ९० हजार ००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर १६४ वाहनचालकांकडून १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

ही कारवाई प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग, पोलीस निरीक्षक अमोल देवकर, राजेश यादव, श्री. आघाव, सहायक पोलीस निरीक्षक हरेश्वर घुगे, सुनिल कराळे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी त्यांचे सहकारी अंमलदारांच्या मदतीने केली. यापुढे राँग साईड व ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी वाहनचालक परवाना, वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगावी. सर्व वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांनी केले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश

Latest News

आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश आ. सत्तार हाजीर हो, सिल्लोड न्यायालयाने काढले आदेश
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार पुन्हा गोत्यात येण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या जाहीर...
भरधाव पिकअप वाहनाने स्कुटीला उडवले, मायलेकी जखमी, छत्रपती संभाजीनगर शहराजवळील घटना
सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software