बजाजनगरात दारूड्यांचा कहर : भर चौकात दोन सख्ख्या भावांना ३ दारूड्यांची बेदम मारहाण, लोखंडी गज डोक्यात घालून केले जखमी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : बजाजनगरात दारूड्यांनी कहर केला आहे. ते कोणत्याही कारणावरून वाद सुरू करतात आणि हाणामाऱ्या करत आहेत. गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) रात्री सव्वा दहाच्या सुमारास बजाजनगरातील शिवराणा चौकात ३ दारूड्यांनी हॉटेलच्या वेटर आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केली. लोखंडी गजाने वेटरचे डोके फोडले. हे दोन्ही भाऊ कामावरून स्कुटीने घरी परतत होते.

आनंद दादाराव पगडे (वय १९, रा. सिडको वाळूज महानगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो आई, वडील व भाऊ शुभमसह राहतो. तो जय भवानी चौकातील तुळजा भोजनालयात वेटर आहे. गुरुवारी (२७ नोव्‍हेंबर) तुळजा भोजनालयातून कामाला सुटी झाल्यानंतर रात्री सव्वा दहाला शुभम त्याला स्कुटी घेऊन घ्यायला आला. दोघे स्कुटीने (क्र. एमएच २०, जीडब्ल्यू ५२८४) घरी येत असताना रात्री साडेदहाला बजाजनगरातील शिवराणा चौकात आले. वाहतूक जास्त असल्याने त्यांनी गाडी थांबवली. त्याचवेळी तेथे एक व्यक्ती दारू पिलेल्या अवस्थेत आला. त्याने तुम्ही आमच्या घरासमोर का थांबले?, असे म्हणत आनंद व शुभमसोबत वाद सुरू केला.

शिवीगाळ करत त्याने त्याच्या मोबाइलवरून कॉल करून त्याच्या दोन साथीदारांना बोलावून घेतले. तिघांनी मिळून लोखंडी गजाने आनंद व शुभमला मारहाण केली. डोक्यात गज मारल्याने आनंद जखमी झाला. त्यानंतर तिघेही कारमधून निघून गेले. आनंद व शुभमने आजूबाजूला राहणाऱ्या मुलांकडे चौकशी केली असता हल्लेखोराचे नाव सौरभ देशमुख (रा. शिवराणा चौक बजाजनगर) असे समजले. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी आनंदने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सौरभ देशमुख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार संतोष सूर्यवंशी करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software