जयस्वाल हॉल ते टीव्ही सेंटरवरील या दुकानदाराने पोलीस आयुक्‍तांचा आदेश काढला मोडित!; सिडको पोलिसांचे होतेय दुर्लक्ष!‌! 

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : पोलीस आयुक्तालय हद्दीत लेझर लाईट्स, बीम लाईट्सच्या वापरास मनाई आहे. मात्र जयस्वाल हॉल ते टीव्ही सेंटर या रोडवरील एका दुकानदाराने लावलेल्या लेझर लाइट्‌समुळे वाहनधारक, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे लाइट्‌स अचानक डोळ्यांवर येऊन समोरचे काही काळ दिसेनासे होते. पोलिसांना अद्याप या दुकानावर कारवाई का करावीसी वाटली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लेझर लाईटस, बीम लाईटसच्या वापरावर ८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस आयुक्‍तालय हद्दीत बंदीचे आदेश पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिले आहेत. मात्र सिडको पोलिसांना आयुक्‍तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अडचण येत आहे, की जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. टीव्ही सेंटर रोडवर दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दी उसळत आहे. अशातच या दुकानदाराने स्वतःच्या दुकानाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क लेझर लाइट्‌स सोडले आहेत, जे  दूरदूरपर्यंत आकाशात चमकत आहेत, पण वाहनधारकांच्या डोळ्यांनाही इजा पोहोचवत आहेत. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्‍तांच्या आदेशाचे उल्लघंन करणाऱ्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये व प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल व तो शिक्षेस पात्र राहील, असे आदेशात पोलीस आयुक्‍तांनी म्हटले होते. या दुकानदाराला पोलीस आयुक्‍तांच्या आदेशाची माहिती नाही, की तो या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न नागरिक करत आहेत.

वाइन शॉपसमोर वाहतूक कोंडी
जयस्वाल हॉलजवळील वाइन शॉपसमोर तळीरामांची वाहने वाहतूक कोंडी करत आहेत. तळीरामांची वाहने पार रस्‍त्‍यावरच लागत असल्याने अन्य दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे. एखादे मोठे वाहन आले तर ते अडकून पडत आहे. पोलीस आले की, दुचाकी वाहने बाजूला घेण्याचा प्रयत्न केला जातो, पोलीस गेले, की पुन्हा वाहतूक कोंडी होते. सोमवारी (२० ऑक्‍टोबर) रात्रीही अशीच वाहतूक कोंडी होत असताना संतापलेल्या पोलिसांनी रस्‍त्‍यावर लागलेल्या दुचाकींचे फोटो काढून घेत दुकानचालकालाही सुनावल्याचे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!

Latest News

Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प! Good News : शेंद्र्याजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर साकारणार प्रकल्प!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शेंद्रा एमआयडीसीजवळील जयपूर एमआयडीसीत महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनी १५० एकरवर प्रकल्प साकारणार असल्याची सकारात्मक...
बौद्ध समाजमंदिरावर चालवला जेसीबी!; पाडळसा उपसरपंचाचे कृत्य, गंगापूर तालुक्यातील खळबळजनक घटना
घरगुती गॅस जादा दराने विक्री केल्यास खैर नाही!; विभागीय आयुक्तांचा साठेबाजांना कडक इशारा!!; ११ पथकांकडून दिवसभर जिल्हाभरातील गॅस एजन्सीची तपासणी
कन्नड, खुलताबाद तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड. नीलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट
अजिंठा-वेरूळमध्ये चालणार कथित व्हीव्हीआयपींची दादागिरी!, पर्यटकांच्या सुरक्षेसाठीही उचलली कडक पावले!; विभागीय आयुक्तांनी बैठक घेऊन अधिकाऱ्यांना दिले आदेश
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software