- News
- सिटी क्राईम
- Follow up Story : सिंधी कॉलनीत ३ माळ्यांची बिल्डिंग, २० खोल्या, तरुण-तरुणी एकत्रच राहत होते, फारूकी
Follow up Story : सिंधी कॉलनीत ३ माळ्यांची बिल्डिंग, २० खोल्या, तरुण-तरुणी एकत्रच राहत होते, फारूकी बसल्याजागी सर्व काही पुरवायचा...
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमध्ये काम करत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६ भाड्याने घेण्यात आला होता. या ३ माळ्याच्या इमारतीची पोलिसांनी शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) तीन तास झाडाझडती घेतली. २० हून अधिक खोल्या आढळल्या. दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्ड व घोटाळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील बनावट शासकीय कागदपत्रांचे गठ्ठे सापडले. मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या भाविक पटेलचा पासपोर्टही मिळून आला.
फारूकीने सहा प्रमुख संशयितांसह ११४ कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सिंधी कॉलनीतील बंगला क्र. ५६ भाड्याने घेतला होता. तरुण-तरुणी एकत्रच राहत होते. त्यांना दिवसभर बाहेर कुठेही जाण्याची अनुमती नव्हती. पगाराव्यतिरिक्त त्यांचा सर्व खर्च फारुकीकडून केला जायचा. अटकेतील सात मुख्य संशयितांसह सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कर्मचारी तरुण-तरुणींकडून रॅकेट कसे चालायचे, प्रशिक्षण कोणी दिले याबाबची माहिती पोलीस घेणार आहेत. या गुन्ह्याच्या तपासाची माहिती अमेरिकन तपास संस्था एफबीआयसुद्धा घेत आहे. एफबीआयच्या दिल्लीस्थित कार्यालयातील अधिकारी शहर पोलिसांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली, त्यांची माहिती लवकरच ई-मेलद्वारे मागवण्यात येणार आहे.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
तुमचे वॉशिंग मशीन खूप वीज वापरते? वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा टिप्स
By City News Desk
विहिरीत पडून २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू, सिल्लोड तालुक्यातील घटना
By City News Desk
Latest News
14 Dec 2025 21:47:31
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...

