विश्लेषण : रूम नं. २०५ चं काय आहे सत्य?; रात्री ११ ते पहाटेचे ३ रूममध्ये काय घडलं..., छत्रपती संभाजीनगरातील 'गँगरेप'मागे काही दडलंय काय?

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वेस्थानकाजवळील हॉटेल ग्रेट पंजाबच्या रूम नं. २०५ मध्ये ३२ वर्षीय नर्स युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघ्या राज्यात खळबळ उडाली आहे. मित्रासोबत हॉटेलमध्ये आलेली युवती चुकून संशयित तिघा युवकांच्या रूममध्ये जाते, तिथे तिच्यावर आळीपाळीने बलात्कार होतो, हे ऐकायला जितके संभ्रमावस्थेत टाकणारे आहे, तितकेच त्यामागचे सत्य काय आहे, यावरूनही चर्चा घडताना दिसत आहे. एवढे मात्र निश्चित, की एका मोठ्या चुकीमुळे तिघा युवकांच्या आयुष्याचे आता पार वाटोळे झाले आहे... त्यांनी अत्याचार केला की सहमतीने संबंध ठेवले, हे यथावकाश समोर येईलच, पण या घटनेतून समाजातील अनैतिकतेवरही प्रकाश टाकला आहे...

अशी घडली होती घटना...
३२ वर्षीय युवती शहरात पतीसह राहते. ती एका प्रसिद्ध खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तिचा पतीही खासगी इलेक्ट्रॉनिक शोरूममध्ये काम करतो. तक्रारीनुसार, ती तिच्या भोकरदनच्या मित्राला सात-आठ वर्षांपासून ओळखते. १७ डिसेंबरला त्याने दुपारी साडेतीनला तिला कॉल केला. त्याने भेटण्याबद्दल विचारले. त्यावर तिने घरी आहे, असे सांगितले. रात्री साडेआठला मोंढा नाक्यावर दोघे भेटले. तिथून तो तिला घेऊन रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल ग्रेट पंजाबमध्ये गेला. रूम नं. १०५ बुक केली. दोघांनी सोबत गप्पा करत दारू पिली. रात्री साडेदहाच्या सुमारास ती घरी जाते, असे त्याला सांगून रूममधून बाहेर पडली. हॉटेलबाहेर आली. रेल्वेस्टेशन येथे गेली. मात्र तिला कुठे जावे हे समजत नव्हते. त्यामुळे ती परत ग्रेट पंजाब हॉटेलमध्ये आली. रूम नं. १०५ मध्ये जाण्याऐवजी चुकून २०५ रूममध्ये गेली. तिथे तीन युवक दारू पित होते. युवतीने त्यांना विचारले, की माझा मित्र कुठे आहे? तिघांपैकी एक जण म्हणाला, की तुमचा मित्र येथेच आहे. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. त्यामुळे युवती रूममध्ये आली. युवकांनी रूमचा दरवाजा बंद केला.

मग ते म्हणाले, की तुमच्या मित्राने बिअर आणलेली आहे. बिअर प्या... युवतीने बिअर पिली. युवतीने त्यांना नावे विचारली. किरण राठोड, घनश्याम राठोड, ऋषिकेश चव्हाण अशी नावे त्यांनी सांगितली. किरणने तिच्यासोबत जबरदस्ती करत तिचे कपडे काढले आणि शारीरिक संबंध केले. त्यावेळी घनश्याम, ऋषिकेश रूमच्या गॅलरीत थांबले. त्यानंतर घनश्याम रूममध्ये आला, त्यानेही तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. नंतर ऋषिकेश आला. त्यानेही तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. अशाप्रकारे आळीपाळीने तिघांनी तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध केले. त्यानंतर ते रूमबाहेर पडून हॉटेलमधून पळून गेले. युवतीने आरडाओरड करत पहाटे तीनच्या सुमारास रूमबाहेर आली. हॉटेल मॅनेजरला घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून मॅनेजरने तिला रूम नं. २०५ घनश्याम राठोडने बुक केली होती, अशी माहिती पुरवली. त्यानंतर तरुणीने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठले...

पोलिसांनी तत्परतेने संशयितांच्या आवळल्‍या मुसक्या...
प्रथमदर्शनी सामूहिक बलात्कारासारखी घटना समोर आल्याने पोलीस अलर्ट मोडवर आले होते. अगदी सहायक पोलीस आयुक्त सागर देशमुख, पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी अवघ्या काही मिनिटांत पोलीस ठाणे गाठले. पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी, अंमलदार रणजित सुलाने, मनोज चव्हाण, प्रवीण मुळे यांना तपासाच्या सूचना केल्या. संशयित शहरातून पळून जाणार नाही, यासाठी घटनेबद्दल गोपनीयता बाळगण्यात आली. जिन्सी, मोंढा नाका आणि भानुदासनगरातून तिघांच्या १८ डिसेंबरच्या सायंकाळपर्यंत मुसक्या आवळण्यात आल्या. संशयित घनश्याम भाऊलाल राठोड (वय २७, रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी, जवाहरनगर), किरण लक्ष्मण राठोड (वय २६, रा. भानुदासनगर), ऋषिकेश तुळशीराम चव्हाण (वय २५, रा. न्यू शांतीनिकेतन कॉलनी) हे फायनान्स कंपनीसाठी रिकव्हरीचे काम करतात, असे तपासातून समोर आले. बुधवारी रात्री त्यांनी हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी रूम बुक केली होती. रूम घेण्यासाठी एकाचा क्रमांक दिला होता. पोलिसांनी त्या क्रमांकावरून तिघांचा शोध लावला होता...

नैतिकतेचा प्रश्न...
या घटनेची चर्चा राज्यभर झाली. पण सातत्याने एक प्रश्न विचारण्यात आला, एक युवती मित्रासोबत हॉटेलमध्ये जाते, दारू पिते, नंतर चुकून दुसऱ्या खोलीत जाते, तिथे ओळखीपाळखी होतात, साधारण ती ११ वाजता त्या रूममध्ये चुकून गेली, असे मानले तरी पहाटेच्या ३ वाजेपर्यंत एक मोठा कालखंड आहे... एवढा वेळ तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असताना आरडाओरड का झाली नाही, पहाटे ३ ला तिघे हॉटेलमधून पळून गेल्यानंतर तत्परतेने युवती खाली आली, हॉटेल मॅनेजरला सांगितले, हा घटनाक्रम अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. मित्रासोबत हॉटेलमध्ये रूममध्ये येणे आणि दारू पिणे हेच मुळात अनैतिकतेच्या पलीकडे जाणारे आहे. ज्या तरुणांवर हा आरोप होत आहे, त्यांना उद्या कदाचित शिक्षा होईल किंवा ते सुटतीलही, पण त्यांच्यावरचा हा डाग, केवळ त्यांचेच नाही तर त्यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबीयांचेही आयुष्य उद्‌ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे तरुणाईला ही घटना एक मोठा धडा देणारी ठरली आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...

Latest News

छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले... छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना उद्योगमंत्र्यांनी केले आश्वस्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे अधिकार वापरण्याची केली सूचना, उद्योजकांशी बोलताना काय म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : इराण-इस्त्रायल युद्धामुळे केंद्र सरकारने कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद केला. गॅसअभावी छत्रपती संभाजीनगरमधील अनेक कंपन्या...
११ लाख ग्राहक, २० हजार सिलिंडर्सची रोजची गरज, ७७ गॅस एजन्सी, ऑनलाइन बुकिंग सेवा बंद... छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे घरगुती गॅस सिलिंडरचे चित्र...
अवैध सावकारी गुंडांनी बांधकाम व्यावसायिकाचे जगणे केले अवघड, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक, ५ लाखांच्या बदल्यात १६ लाख गेले, अडीच एकर जमीन हडपली, ॲट्रॉसिटी, मुलाच्या अपहरणाच्या धमक्या..., छत्रपती संभाजीनगर शहरातील धक्कादायक प्रकार उघड
टवाळखोरांनी हद्दच केली... शाळेबाहेरच दहावीतील विद्यार्थिनीची छेड, भावाने जाब विचारल्याने फायटरने केले रक्तबंबाळ!; वैजापूर तालुक्यातील खंडाळ्याची संतापजनक घटना
समाजकंटकांचा निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरावर हल्ला, महाराजांसोबत कुटुंबीयांनाही अमानुष मारहाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळली संतापाची लाट
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software