पन्नाशीतही असे धावले राजाभाऊ की उत्साह पाहून तरुणाई लाजली, स्पेशल बक्षीस पटकावले!, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आहेत कार्यरत...

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातर्फे ‘रन फॉर युनिटी’ उपक्रम आज, ३१ ऑक्‍टोबरला सकाळी सातला राबविण्यात आला. यात उपक्रमात पोलिसांसोबत २०० विद्यार्थी सहभाग नोंदवून धावले.

रमेश मोरे चौक ते कोलगेट चौक या ४ किलोमीटरच्या अंतरावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्‌घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी हिरवा झेंडी दाखवून केले. यात पुरुष गटात विनोद ढाले प्रथम, विठ्ठल सातनार द्वितीय, कृष्णा पवार तृतीय आले. महिला गटात जयश्री भटकर प्रथम, रुपाली चव्हाण द्वितीय, शारदा गायकवाड तृतीय आली. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत राजाभाऊ कोल्हे यांनी वयाच्या ५० व्या वर्षी स्पर्धेत सहभाग घेत शर्यत पूर्ण करून स्पेशल विजेतेपद मिळवले. सर्व विजेत्यांना लवकरच आयोजित विशेष कार्यक्रमात पारितोषिके देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक अरविंद शिंदे, अशोक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, विनोद आबूज, राजाभाऊ कोल्हे, सुरेश कचे, शुभम वीर, जालिंदर रंधे, राम बिघोत, नीलेश पाटील, जयश्री फुके, जयश्री म्हस्के, संगिता वैद्य आदींनीही भाग घेतला.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सिटी चौक परिसरातून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software