छत्रपती संभाजीनगरच्या लाचखोर सरकारी वकील ॲड. शरद बांगरला अटक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरचा लाचखोर सरकारी वकील ॲड. शरद बन्सी बांगर (वय ४३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (१९ नोव्‍हेंबर) दुपारी अटक केली. जिल्हा व सत्र न्यायालयातील त्याच्याच दालनातून जालना एसीबीने त्याला उचलले आणि त्याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण...
सहायक फौजदाराने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे याप्रकरणी तक्रार केली होती. ते छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. २२ मार्च २०२२ रोजी लाच घेतल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही झाली होती. मात्र १९ नोव्हेंबर २०२४ रोजी ते या गुन्ह्यातून निर्दोष सुटले. न्यायालयाच्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी ॲड. बांगरने त्यांना २ लाख रुपयांची लाच मागितली. उतारवयात नसते झेंगट नको म्हणून दीड लाख रुपये सहायक फौजदारांनी दिलेही. मात्र उरलेल्या ५० हजारांसाठी बांगर त्यांना त्रास देत होता. काही दिवसांपासून त्याच्या सहायकाच्या क्रमांकावरून कॉल करून तो सतत पैशांची मागणी करायचा. त्यामुळे सहायक फौजदारांनी थेट एसीबीकडे धाव घेतली. 

सामान्यांचा एसीबीवरील विश्वास झाला दृढ
ॲड. बांगर हा ऑक्टोबर २०१५ मध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्त झाला असून, विशेष म्हणजे तो सध्या छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वकिली करायचा. मात्र जेव्हा हे प्रकरण एसीबीच्या समोर आले, तेव्हा कर्तव्याला जागत एसीबीने त्यालाच अटक केली, हे विशेष. यावरून एसीबीवरील सामान्यांचा विश्वास दृढ होण्यास मदत झाली आहे. एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांनी या प्रकरणात कारवाईसाठी जालना एसीबीला सांगितले होते. 

सापळ्यात अडकला नाही...
जालना एसीबीचे उपअधीक्षक बी. एस. जाधवर यांनी तक्रारीची शहनिशा केली. बांगरने ५० हजारांऐवजी तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी न्यायालयातच सापळा लावण्यात आला. मात्र, बांगर कार्यालयात आलाच नाही. त्याने सहायक फौजदाराला तुम्ही आता तुमच्याच वकिलाला बोला, असे सांगितले होते. त्यामुळे १८ नोव्हेंबरला पुन्हा सापळा लावण्यात आला. एसीबीच्या केसेस लढत असल्याने बांगरला एसीबीच्या कारवायांची पद्धती माहिती होती. त्यामुळे त्याने लाच घेण्यास टाळाटाळ केली. पैसे आणून देतो, काही कमी करा, असे सहायक फौजदार म्हणाले, तेव्हाच त्याला संशय आला. मात्र तोपर्यंत त्याने लाच मागितल्याचे सबळ पुरावे एसीबीकडे आल्याने जालना एसीबी उपअधीक्षक बी. एस. जाधवर आणि पोलीस निरीक्षक कोमल शिंदे यांच्या पथकाने त्याला अटक केलीच.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software