छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचालक झाले बेदरकार... आता शिवाजीनगर भागात घडवला थरार, २ भाजीविक्रेत्या महिलांना उडवले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : शहरात गेल्या काही दिवसांत कारचालक बेदरकार झाले असून, त्यांच्या वेगाला लगाम लावण्याकडे पोलीस लक्ष देत नसल्याने शिवाजीनगरातही रविवारी (४ जानेवारी) दुपारी १२ ला एका कारचालकाने थरार घडवला. सुसाट कारने दोन भाजीविक्रेत्या महिलांना उडवले. यात दोघीही गंभीर जखमी झाल्या.

बेदरकार कारचालकांनी गेल्या काही दिवसांत शहरात अनेकांना जखमी, तर अनेकांचे बळी घेतले आहेत. ४ दिवसांपूर्वीच शिवाजीनगर रेल्वेगेटजवळ एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला सुसाट कारने उडवले होते. ३ दिवसांपूर्वी सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली एका स्कुटीस्वार दाम्‍पत्‍याला सुसाट कारने उडवले होते. परवाच चिकलठाणा एमआयडीसीत सुसाट कारने ५५ वर्षीय महिलेचा बळी घेतला. काही दिवसांपूर्वी सुसाट कारने मोंढा नाका उड्डाणपुलावर दोघांचा बळी घेतला होता. कारचालकांच्या वाढत्‍या वेगाला आवरण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे चित्र आहे.

आता काय घडलं?
शिवाजीनगर ते मेहरसिंग नाईक कॉलेज रस्त्यावर वळणावरच दोन्ही बाजूंनी भाजीपाला विक्रेते हातगाड्या लावतात. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हातगाड्यांवर भाजीपाला विक्री सुरू होती. त्याचवेळी भुयारी मार्गाकडून सुसाट कार (क्र. एमएच ०४ जीई १४४१) आली. चालक मेहरसिंग नाईक कॉलेजकडे वळण घेत असताना समोरून रिक्षा आली. त्यामुळे वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

कारने प्रथम बानुबी मोहंमद सय्यद (वय ५७) आणि नंतर सुमनबाई दगडू हिवाळे (वय ५८) यांना उडवले. भारतनगरच्या रहिवासी आहेत. कार इतकी भरधाव होती, की सुमनबाईंची हातगाडी हवेत उडून दूर फेकली गेली. हातगाड्यांवरील भाजीपाला रस्त्यावर विखुरला गेला. अपघातानंतर कार थांबली. कारचालकाला नागरिकांनी पकडले. मात्र वेळीच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील म्हस्के घटनास्थळी आले. त्यांनी कारचालकाला ताब्यात घेतले. जखमी महिलांना खासगी रुग्णालयात हलविले. कारही जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना सत्यनारायण पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
वैजापूर/पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : सत्यनारायणाच्या पूजेसाठी निघालेल्या पुजाऱ्याचा दुचाकी घसरून अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी...
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू, वैजापूर तालुक्यातील दुर्दैवी घटना
शिंदे गटाला सोबत घ्यावेच लागणार, पण ‘अटींचा’ भडीमार नको म्हणून भाजपच्या खेळ्या सुरू..., शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे काय म्हणाले...
२० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार लैंगिक अत्याचार, वाळूज MIDC तील रांजणगाव शेणपुंजीची घटना
शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगसेवकांनी पराभूत भाजप उमेदवाराच्या घरासमोर नाचवली तलवार!, विजयी रॅलीदरम्यान प्रभाग १८ मधील धक्कादायक प्रकार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software