सराफा व्यापाऱ्यावर ४ टवाळखोरांचा प्राणघातक हल्ला, दारू पिण्यासाठी पैसे मागत लाकडी दांड्याचे वार, व्यापारी जखमी, हडको एन ११ मधील खळबळजनक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ४ टवाळखोरांनी दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने सराफा व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. लाकडी दांड्याने मारून जखमी केले. यात व्यापारी जखमी झाला. ही घटना गुरुवारी (४ डिसेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास हडको एन ११ मध्ये घडली. प्रणित दिगंबर जोजारे (वय २६, रा. हडको एन ११, द्वारकानगर) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे.

प्रणित हे सोन्याचे दुकान चालवतात. गुरुवारी (४ डिसेंबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास ते घराजवळ भाजीमंडीच्या परिसरात फिरत असताना ओळखीचा रोहन झाला (रा. एन १२ हडको), आकाश ठोंबरे (रा. मयूर पार्क), निखील वडागळे (एन११ हडको), विक्की सूर्यवंशी (रा. एन ११ हडको) हे प्रणित यांच्याकडे आले. त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. प्रणित यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी शिवीगाळ सुरू केली. तेवढ्यावरच न थांबता हाताचापटाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

रोहनने लाकडी दांड्याने डोक्यात व पाठीत, कानावर, नाकावर मारून जखमी केले. प्रणित यांची गळ्यातील सोन्याची चैन व हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाली. आजूबाजूला लोक जमा झाल्याने चौघेही पळून गेले. पळून जाताना त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रणित यांनी सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी चारही हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार भारती गायकवाड करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software