तयार होऊन गाडीवर बसले, तितक्यात तो म्हणाला तलाक तलाक तलाक... अन्‌ माहेरी आणून सोडले!; बेगमपुरा पोलीस ठाण्यात पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी तलाकची घटना समोर आली आहे. २३ वर्षीय तरुणीला तिच्या पतीने दुचाकीवर बसतानाच तलाक तलाक तलाक म्हटले. तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

शेख समरीन शेख नदीम (वय २३, रा. भिमबावडी जवळ कोहीनूर कॉलनी पाणचक्की छत्रपती संभाजीनगर ह. मु. आसेगाव नुरानी मस्जीद पाणीटाकीजवळ ता. गंगापूर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून पती नदीम शेख, सासरे निसार अहमद अब्दुल अजीज, सासू शेख शमीम या तिघांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, समरीनचे पती बांधकाम ठेकेदार आहेत.

तिचे लग्न १८ फेब्रुवारी २०२५ रोजी झाले होते. २१ जुलैला सकाळी ७ ला घरातील कामे आवरत असताना सासू शमीम व सासरे निसार यांनी तिला चहा करण्यास सांगितला. तिने चहा करून दिला. नंतर त्यांनी पुन्हा तीन वेळेस चहा करण्यास सांगितले. तिने चहा करून दिला व रूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने पती रूममध्ये आला व मारहाण करण्यास सुरवात केली. नंतर सासू, सासऱ्यांनीही चापट बुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर तिने वडिलांना कॉल करून बोलावून घेतले. त्यांच्यासोबत माहेरी निघून आली.

त्या दिवशी काय घडलं...
२३ नोव्‍हेंबरला पती, सासरे तिच्या माहेरी आसेगावला आले. आम्ही समरीनला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत, असे सांगितले व सासरी घेऊन गेले. त्यानंतर दोन दिवसांनी २५ नोव्‍हेंबरला तिला पतीने माझी परीक्षा आहे व तुझीपण परीक्षा आहे. त्यामुळे मी तुला तुझ्या घरी सोडतो, असे सांगून तयार होण्यास सांगितले. दोघे तयार होऊन घराबाहेर आले. ती मोटारसायकलवर बसल्यानंतर त्याने लगेचच ‘तलाक तलाक तलाक’ असे म्हणून तिला तलाक दिला. तिला माहेरी आसेगावला सोडले आणि निघून गेला. त्यानंतर समरीनला नांदविण्यास नकार दिला. शरीयतनुसार तुला सोडले आहे, असे म्हटला.
वडिलांनी दिलेल्या भरगच्च भेटवस्तू
समरीनच्या वडिलांनी लग्नात संसारासाठी म्हणून अनेक महागड्या वस्तू दिल्या होत्या. त्यात फ्रीज, वॉशिंग मशीन, कुलर, लोखंडी पलंग, लोखंडी अलमारी, लोखंडी सोफासेट, इंडेक्शन लाइटची शेगडी व स्टीलचे भांडे दिले होते. अधिक तपास पोलीस अंमलदार यास्मीन खान करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

बीड बायपासवरील लॉजवर पकडल्या २ बांगलादेशी महिला

Latest News

Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software