कामगाराचे कपडे काढून ठेकेदाराकडून अमानुष मारहाण!, वाळूज पंढरपुरातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : दारू पाजून कामगाराचे कपडे काढले आणि लाथाबुक्क्या आणि बेल्टने अमानुष मारहाण केली. सातारा पोलिसांनी ठेकेदारासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पंढरपूरच्या कामगार चौकाच्या पुढे पाटोदा रोडवर घडली.

नितीन अशोक गायकवाड (वय ३०, रा. सिडको महानगर १ वाळूज) या युवकाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो माती काम करतो. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नितीन ज्यांच्याकडे काम करतो, तो ठेकेदार राजू धोतरे व त्याच्यासोबत प्रविण गायकवाड (दोघे रा. पंढरपूर झोपडपट्टी) हे नितीनकडे आले. त्यांनी त्याला गाडीवर बसवून पाटोदा रोडवर कंटेनर लावतात तिथे नेले. तेथे त्यांनी नितीनला दारू पाजली. त्यानंतर नितीनला काही कळण्याच्या आतच त्याचे कपडे काढून एकाने त्याचे हात धरले. दुसऱ्याने लाथाबुक्क्यांनी व बेल्टने मारहाण केली.  अधिक तपास पोलीस अंमलदार महेश गोले करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना

Latest News

कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना कॉपीमुक्त अभियान सामूहिक जबाबदारी, जिल्हाधिकारी स्वामी यांची स्‍पष्ट सूचना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कॉपीमुक्त अभियान राबविणे हे नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे...
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रशासनाची काय तयारी, मतदारांपासून बंदोबस्तापर्यंत, उमेदवारांना सूचना काय... जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वच सांगितले... ही बातमी प्रत्येकाने आवर्जुन वाचा...
असा आला, असा निघून गेला...CCTV मध्ये हा कोण दिसला?, वाळूज महानगरातील घटना
आत मतमोजणी, बाहेर अलोट गर्दी, मानली संधी अन्‌ चोरट्यांनी कमावले १० लाख!; गरवारे स्टेडियमवर सोन्याचे दागिने, रोकडवर मारला हात!!
तुझ्यामुळेच पराभूत झालो म्हणत भाजप उमेदवाराच्या घरावर टोळक्याचा सशस्‍त्र हल्ला!, क्रांती चौक भागातील गांधीनगरातील मध्यरात्रीचा थरार
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software