शेंद्र्यात जालना रोडवर हिट ॲन्ड रन : सुसाट कारने स्कुटीला उडवले, वृद्धेचा मृत्यू

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील शेंद्र्यात जालना रोडवर सुसाट कार स्कुटीला उडवून पसार झाली. स्कुटीवरील वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्यांचा भाचा जखमी झाला आहे. चिकलठाणा पोलिसांनी कारचालकाविरुद्ध बुधवारी (१२ नोव्‍हेंबर) गुन्हा दाखल करून शोध सुरू केला आहे.

कावेरीबाई श्रीकृष्ण बोरबळे (वय ७७, रा. केळवद, ता. चिखली, जि. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. त्यांचे भाचे रवि मधुकर बोंद्रे (वय ४९, रा. रामहरीनगर शेंद्रा एमआयडीसी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते बदनापूर ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी फॉर्मासिस्ट आहेत. त्यांच्याकडे टीव्हीएस कंपनीची जुपिटर स्कुटी आहे. ८ नोव्हेंबरला दुपारी ४ च्या सुमारास ते त्यांची आत्या कावेरीबाई श्रीकृष्ण बोरबळे यांच्यासोबत घरी येत होते.

जालना रोडने शेंद्राकडे जात असताना संदीप हॉटेलसमोर सायंकाळी सव्वा सहाला उजव्या बाजूने मागून भरधाव कारने येऊन त्यांना धडक दिली. यात रवि आणि त्यांची आत्या कावेरीबाई जखमी झाले. कावेरीबाई यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. कारचालक कारसह पळून गेला. नागरिकांनी त्यांना ओरीअॉन सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कावेरीबाई यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे ९ नोव्‍हेंबरला सायंकाळी सहाला मृत्यू झाला. उपचार घेतल्यानंतर रवि यांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software