चिमुकलीवरील अत्याचारानंतर संतप्त समाजबांधवांचा पोलीस आयुक्‍तालयासमोर आक्रोश!, शाळाचालक नराधमाचा निघाला भाऊ

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : ३ वर्षीय चिमुकलीवर ५५ वर्षीय विकृताने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे पदमपुऱ्यात सारेच सुन्न झाले आहेत. शनिवारी (१८ ऑक्‍टोबर) दुपारी समाजबांधवांनी पोलीस आयुक्‍तालय गाठून नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी केली. या प्रकरणात पीडित मुलगी शिकत असलेली शाळा नराधमाच्या भावाची असून, शाळा आणि शाळेचा संचालकही या घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांनी केली.

काय आहे घटना
शाळा सुटल्यानंतर चिमुकलीला विजय हरिदास जीवनवाल (वय ५५, रा. पदमपुरा) हा नराधम घेऊन जायचा आणि अत्याचार करायचा. १४ ऑक्‍टोबरला दुपारी चिमुकलीने आईला सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत नराधम विजयला अटक केली आहे. महिलेला ३ वर्षांची मुलगी व ५ वर्षांचा मुलगा असून ते दोघेही एकाच शाळेत शिकतात. मुलीची शाळा दुपारी १२:३० वाजता, तर मुलाची १ वाजता सुटते. दोघांना एकाचवेळी शाळेतून घरी आणण्यासाठी महिला १ वाजता शाळेत जाते. या अर्ध्या तासात जीवनवाल मुलीला गाठून सोबत घेत अनैसर्गिक कृत्य करायचा.

दुपारी महिला नेहमीप्रमाणे मुला-मुलीला शाळेतून घरी घेऊन आली. जेवण करत असताना मुलीने त्यांना एक अंकल रोज सोबत नेऊन गुदगुदी करत असल्याचे सांगितले. महिलेने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने जीवनवाल करत असलेले कृत्य करून दाखवले होते. नराधम विजय शाळेजवळच राहतो. त्याने मुलगी शाळेतून कधी बाहेर येते, तिची आई तिला केव्हा घ्यायला येते हे हेरून ठेवले होते. त्यानुसार साडेबारा ते १ या वेळेतच तो मुलीला गाठून सोबत नेत लैंगिक कृत्य करायचा. शाळा विजयच्या सख्ख्या भावाची असून, शाळा, शिक्षक किंवा संस्थाचालकाने त्याच्या कृत्यात साथ दिली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

वेदांतनगरच्या पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांनी सांगितले, की शाळेवर कारवाईसाठी शिक्षण विभागाला पत्र लिहिले असून, सोमवारी (२० ऑक्‍टोबर) स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा करणार आहे. दरम्यान, संतप्त समाजबांधवांनी शनिवारी दुपारी पोलीस आयुक्तालय गाठून नराधमाविरुद्ध सबळ पुराव्यानिशी दोषारोपपत्र तयार करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी केली. या घटनेला शाळाही जबाबदार असून, शिक्षक, शिक्षिका आणि संचालकावरही कारवाई करण्याची मागणी केली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software