सिल्कमिल कॉलनीत मोठी कारवाई; कुख्यात ड्रग्ज तस्कर शेख मिजान गजाआड!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कुख्यात ड्रग्ज तस्कर शेख मिजान शेख नईम (वय २७, रा. सिल्कमिल कॉलनी, गल्ली नं. ३) याच्या मुसक्या आवळण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाला रविवारी (२८ डिसेंबर  रात्री पावणेअकराच्या सुमारास यश आले. त्याच्या ताब्यातून ०.८९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याच्याकडील मोबाइलही ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई सिल्कमिल कॉलनीत रेल्वेस्टेशन वॉलकम्पाऊंडजवळ करण्यात आली.

शेख मिजान हा त्याचा साथादीर कैफ कुरैशी (रा. मदनीचौक, रोशनगेट) याच्यासोबत रेल्वेस्टेशन भागात ड्रग्ज विकण्यासाठी आला होता. कैफ पोलिसांना पाहून पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र मात्र मिजानच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. ड्रग्ज त्याने मस्तान आरीफ (रा. भिवंडी, मुंबई) याच्याकडून  आणल्याचे सांगितले. मिजानसह कैफ आणि मस्तान आरीफविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिजान हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुध्द सातारा, क्रांती चौक व जालना पोलीस ठाण्यात ड्रग्ज तस्करीसह खुनाचा प्रयत्न, अवैध शस्‍त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

त्याला पकडण्याची कामगिरी पोलीस आयुक्‍त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्‍त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे, पोलीस अंमलदार लालखाँ पठाण, नवाब शेख, नितेश सुंदर्डे, सतिश जाधव, विजय त्रिभुवन, चालक पोलीस अंमलदार काळे यांनी केली. पोलीस आयुक्तालय अंतर्गत स्थापन झालेल्या अंमली पदार्थ प्रतिबंध शाखेसाठी खास मोबाइल क्रमांक 9529019061 देण्यात आला असून त्यावर शहरामध्ये कोठेही अंमली पदार्थ विक्री करताना किंवा नशा करताना कोणी आढळल्यास कॉल किंवा व्हॉटस ॲपद्वारे मेसेज करून नागरिक माहिती देऊ शकतात. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. चांगली बातमी देणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येईल, असे विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी म्हटले आहे. 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ

Latest News

स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून डांबून ठेवत अमानुष मारहाण, मंजूरपुऱ्यातील घटनेने खळबळ
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : उसने घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून तिघांनी मिळून स्विगी डिलिव्हरी बॉयचे अपहरण करून...
मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्यावर चढवला हल्ला, चिमुकला आक्रोश करत असताना आणखी लचके तोडले, बायजीपुऱ्यातील घटनेने महापालिकेप्रती संतापाची लाट, जी. श्रीकांत पाठ थोपटून घेण्याऐवजी अधिकाऱ्यांना कामाला लावा, नागरिकांची अपेक्षा
छत्रपती संभाजीनगरात पवित्र रमजानची जय्यत तयारी; गुरुवारपासून होणार प्रारंभ
महापालिका आयुक्त संतापले!; नगरसेवकांना बजावले!!; यापुढे शिवीगाळ, अर्वाच्य भाषेत बोलाल तर थेट फौजदारी करणार...
प्रशासनाचा दणका : छत्रपती संभाजीनगरातील ६० ड्रग्ज पेडलर्स, एजंटांवर करणार योगी स्टाईल बुलडोझर कारवाई
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software