रस्त्याच्या दुभाजकावर खांब रोवून लावला हिरवा झेंडा, बेगमपुरा पोलिसांनी युवकाला घेतले ताब्यात

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : रस्त्याच्या दुभाजकावर विनापरवानगी खांब रोवून त्यावर हिरवा झेंडा लावणाऱ्या तरुणाला बेगमपुरा पोलिसांनी सोमवारी (१६ डिसेंबर) गुन्हा दाखल करत ताब्यात घेतले. मकई गेटते टाऊन हॉल रस्‍त्‍यावर हा प्रकार त्याने केला.

महपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आशिष शिंदे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना गोपनीय माहिती मिळाली, की मकई गेटते टाऊन हॉल जाणाऱ्या सार्वजनिक रोडच्या दुभाजकात एक व्यक्ती लोखंडी खांब गाडून त्यावर झेंडा लावत आहे. त्यामुळे शिंदे यांनी लगेचच पथकासह धाव घेतली. सव्वा सहाला त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी पोलीससुद्धा आलेले होते. बघ्यांची गर्दीसुद्धा जमलेलीहोती. खांब रोवून त्यावर हिरव्या रंगाचा झेंडा लावलेला दिसला.

झेंडा लावणारासुद्धा तिथे हजर होता. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने नाव दाऊद अब्दुल खान (वय ३०, रा. मकईगेट रोड प्रगती कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले. पोलिसांनी खांब व झेंड्याचे मोबाइलमध्ये चित्रिकरण केले आहे.  दाऊद खानने झेंडा लावण्यासाठी महापालिकेची तात्पुरती किंवा कायमस्वरुपी परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार फिरोज पठाण करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;

Latest News

औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!; औरंजेबाची कबर जेसीबीने उखडून फेका, तिथे मुत्रालय बांधा : छत्रपती संभाजीनगरातील सभेत टी. राजासिंह कडाडले!;
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : जब जब हिंदू बटा है, तब तब हिंदू कटा है, असे सांगत श्रीराम युवा...
मोठी कारवाई : फुलंब्री शहरात ६ गायींची कत्तल, ८ गायींना वाचवले!; छत्रपती संभाजीनगरहून पोलिसांची टीम गेली, फुलंब्री पोलिसांना दाखवला ‘आरसा’!!
भररस्त्यात उभी केली क्रूझर, पोलिसांना म्हणाला, "हम नगरसेवक पठाण के लोगा, सबकी वर्दी उतरवा दूँगा...’, हर्सूल टी पॉइंटवर दोघांनी कहरच केला..! 
दरवाढ, युद्धाचे सावट, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरही छत्रपती संभाजीनगरच्या सराफा बाजारात मंदी
मळणीयंत्रात अडकून ३० वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, उंडणगाव शिवारातील घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software