महिलेच्या घरातून कुटुंबाला संपविण्याची धमकी, ३० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल, मयूर पार्क भागातील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हर्सूल पोलिसांनी ३० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गुरुवारी (८ जानेवारी) सकाळी आठला मयूर पार्क भागातील शिवकॉलनीत घडली.

छाया काकासाहेब सुलताने (वय ४३, रा. शिवकॉलनी, मयूर पार्क, हर्सूल) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. त्या पतीसह राहतात. त्यांचे पती जालना येथे एसबीआय बँकेत सुरक्षारक्षक आहेत. त्यांचा मुलगा सैन्यात आहे. मुलगी कोमलचे लग्न झाले असून ती पतीसह एन ११ हडको नवनाथनगर येथे राहते. गुरुवारी सकाळी आठला छाया यांचे पती ड्युटीला गेल्यानंतर त्या घरात स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी राहुल संजय गोंगे (वय ३०, रा. सावखेडा खुर्द ता. सिल्लोड) हा घरात घुसला.

छाया यांना म्हणाला, की तू माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. आता मी तुला व तुझ्या नवऱ्याला, तुझ्या मुलीला व तुझ्या जावयाचे कांड केल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या मुलीचे कुंकू पुसून टाकेन, असे धमकावले. त्यावेळी छाया यांनी त्याला तू विनाकारण आम्हाला का त्रास देतो. तू आमच्या कारची काच फोडली. त्यामुळे मी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे, असे सांगितले. त्यावर राहुलने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला. त्यानंतर छाया यांनी हर्सूल पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software