जयभवानीनगर चौकात रात्री उशिरा टवाळखोरांचा धिंगाणा, बसवर दगडफेक

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : कामगारांची ने-आण करणाऱ्या बसवर काही दारूड्यांनी दगडफेक करत धिंगाणा घातल्याचा प्रकार जयभवानीनगर चौकात गुरुवारी (९ ऑक्‍टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडला. यामुळे नागरिकांत दहशत पसरली होती. पोलीस येईपर्यंत टवाळखोरांनी पळ काढला.

जयभवानीनगर चौकात रोज रात्री टवाळखोर जमतात. गुरुवारी रात्री त्यांचा गोंधळ जास्तच वाढला. ते रस्‍त्‍यावर आरडाओरड करत धिंगाणा घालू लागले. याचवेळी कामगारांची बस जात असताना टवाळखोरांनी बसवर दगडफेक केली. त्यामुळे बसचालक घाबरून गेला. बसची समोरील चाक फुटली. चालकाने बस थांबवली. बसमधील कामगार उतरले. पोलीस निरीक्षक अशोक भंडारे यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुनील म्हस्के यांना सहकाऱ्यांसह घटनास्थळी रवाना केले. मात्र तोपर्यंत टवाळखोर गायब झाले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत टवाळखोरांचा शोध घेतला. गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा उच्छाद जयभवानीनगर चौकात वाढला आहे. त्‍यामुळे गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

 

आणखी महत्त्वाच्या बातम्या

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण

Latest News

मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना गुरुवारी (१२ मार्च) दुपारी १ च्या...
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
करमाडजवळील दुर्घटना : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू; मागून येणाऱ्या वाहनाने हूल दिली...
१७ वर्षीय मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या, कन्नड तालुक्यातील धक्कादायक घटना
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software