जिल्हा बँकेचे चौघांनी लुटलेले २५ लाख पोलिसांनी २४ तासांत आणले परत!, LCB ची पैठणमध्ये धडाकेबाज कामगिरी

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तपत्राच्या सौजन्याने) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दावरवाडी शाखेच्या लिपिकाकडून २५ लाख रुपयांची रक्कम लुटणाऱ्या चौघांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक करण्यात यश मिळवले आहे. ते पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या ताब्यातून लुटीची रक्कम आणि कार, मोबाइल असा एकूण ३१ हजार ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई आज, ११ नोव्हेंबरला पैठण शहरात करण्यात आली.

भारत राजेंद्र रूपेकर (वय ३०, रा. नानेगाव ता. पैठण), विष्णू कल्याण बोधने (वय २४, रा. नानेगाव), सचिन विठ्ठल सोलाट (वय २५, रा. राहुलनगर, उत्तर जायकवाडी, पैठण), विशाल दामोधर चांदणे (वय २४, रा. आखातखेडा ता. पैठण) अशी पकडण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत.
अशी झाली होती लूट...
रविवारी (१६ नोव्हेंबर) पाचोड पोलीस ठाण्यात जिल्हा बँकेच्या दावरवाडी उपशाखेचे लिपिक गणेश आनंदा पहिलवान (वय ५९) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्यांनी बँकेच्या पैठण येथील नारळा शाखेतून २५ लाख रुपये घेतले आणि दावरवाडी शाखेकडे स्कुटीने पैठण- पाचोड रस्त्याने येत होते. मागून तोंड बांधून दुचाकीवरून आलेल्या दोन लुटारूंनी त्यांना जोरात दगड मारला. पहिलवान यांनी दगड चुकवला. नंतर तोंड बांधलेल्या लुटारूंनी दुचाकी आडवी लावून पहिलवान यांना थांबवले. काही कळण्याच्या आतच पहिलवान यांच्यावर हल्ला चढवून खाली पाडत मारहाण सुरू केली. नंतर स्कूटीच्या डिक्कीतील कापडी पिशवीत असलेले २५ लाख रुपये घेऊन त्यांनी पाचोडच्या दिशेने धूम ठोकली.

स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला समांतर तपास...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या आणि तपासादरम्यान वेळोवेळी आढावा घेतला. राजपूत यांनी घटनास्थळी सहकाऱ्यांसह भेट दिली. बँकेच्या पैठण शाखेत जाऊन माहिती घेतली. बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांची बारकाईने माहिती काढली. तपासात पथकाला आढळले, की भारत  भारत राजेंद्र रूपेकर (रा. नानेगाव, ता. पैठण) याच्या घरापासून दावरवाडी बँक शाखा अवघ्या २ किलोमीटर असताना तो दूरच्या पैठण येथील शाखेत आलेला होता. तो दोन वर्षांपासून बँकेत व्यवहारासाठी आलेला नसल्याचेही समोर आले. मात्र घटनेच्या दिवशी बँकेत दिसल्याने पथकाचा त्याच्यावर संशय बळावला. यातच तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचेही समोर आले. 

कार पैठण शहराजवळच पकडली...
पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पवन इंगळे यांनी सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक माहितीआधारे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या लुटारूंची कार पैठण शहराजवळच पकडली. त्यांच्याकडील बँकेची रोकड जप्त केली. ६ लाखांची कार व ५६ हजारांचे ८ मोबाइलही जप्त केले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहायक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस अंमलदार विठ्ठल डोके, विष्णू गायकवाड, शिवानंद बनगे, अनिल चव्हाण, अशोक वाघ, राहुल गायकवाड, अनिल काळे, सनी खरात, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली आहे. अधिक तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना

Latest News

चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' तुटून अंगावर पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, कन्नड तालुक्यातील दुर्दैवी घटना
कन्नड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : चाराकुट्टी मशीनचा ‘ब्लोअर' अचानक तुटून अंगावर पडल्याने ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना...
भावासोबत वादानंतर युवकाची गळफास घेऊन आत्‍महत्‍या!; वैजापूर तालुक्यातील घटना
मिसारवाडीतून १७ वर्षीय मुलीचे अपहरण
वेळीच एअरबॅग उघडल्याने वाचले मुख्याध्यापक देविदास चितळे, नियंत्रण सुटून कार २० फूट खोल चारीत कोसळली!, फुलंब्रीजवळील दुर्घटना
सिडको बसस्थानकावर नाश्ता सेंटरचालकावर चौघांचा हल्ला, जुन्या भांडणावरून रिक्षाचालकाची खुन्नस, दोघे जखमी
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software