नायलॉन मांजा विकणाऱ्या २२ वर्षीय क्रूरकर्म्याला अटक!, वेदांतनगर पोलिसांची पद्‌मपुऱ्यात कारवाई

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वेदांतनगर पोलिसांनी पदमपुरा भागात गुरुवारी (१ जानेवारी) छापा मारून नायलॉन मांजा विकणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला अटक केली. आदित्य साईचंद बासनीवाल असे त्याचे नाव असून, त्याच्याकडे नायलॉन मांजाचे १९ गट्टू मिळून आले.

पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आदित्यने पोलिसांना सांगितले, की त्याने नायलॉन मांजाचा माल मुख्य विक्रेता ऋतिक दिलीप लोधे (वय २२, रा. सोनार गल्ली , बन्सीलालनगर) याच्याकडून घेतला होता. ऋतिक सध्या हर्सूल जेलमध्ये आहे. पोलिसांनी ऋतिकला या नवीन गुन्ह्यात पुन्हा सहआरोपी केले आहे. आदित्यला न्यायालयात हजर केले असता ५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या ३००-३५० रुपयांचा गट्टू एक ते दीड हजार रुपयांत विकला जात आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी

Latest News

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त होणार, सहकारमंत्र्यांची विधीमंडळात माहिती, आ. भुमरे यांनी मांडली होती लक्षवेधी
पैठण (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : पैठणच्या संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता गहाण ठेवून उचललेल्या ३० कोटींच्या कर्जापैकी तब्बल १६...
CM फडणवीस चक्क छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अन्‌ अनुसूचित जातीचे... रमाई आवास योजनेत मोठा घोटाळा?; जलील यांनी फोडले ‘टोळी’चे बिंग!, सावेंवर काय केले आरोप...
वाळूज एमआयडीसीतील प्रणव कोटिंग्ज कंपनीत भीषण आग
‘देवगिरी’ सर करण्याआधी प्रत्येक पर्यटकाची कसून तपासणी! आग निष्काळजीपणानेच लागल्याचा संशय
छत्रपती संभाजीनगरात उद्यापासून जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे प्रवचन, दर्शन सोहळा
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software