- News
- सिटी क्राईम
- १६ वर्षीय मुलीला मध्यरात्री झोपेतून उठवून तरुणाने नेले पळवून!; वाळूज MIDC तील घटना
१६ वर्षीय मुलीला मध्यरात्री झोपेतून उठवून तरुणाने नेले पळवून!; वाळूज MIDC तील घटना
On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील नांदेडा येथून १६ वर्षीय मुलीचे तरुणाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तिला मध्यरात्री झोपेतून उठवून पळवून नेण्यात आले आहे. मुलीच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल अंबादास राजपूत (रा. चिंचबन, ता. नेवासा, जि. नगर) असे संशयित तरुणाचे नाव […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील नांदेडा येथून १६ वर्षीय मुलीचे तरुणाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. तिला मध्यरात्री झोपेतून उठवून पळवून नेण्यात आले आहे. मुलीच्या आईने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगेश्वरी येथूनही एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी (९ जून) समोर आली. मुलीच्या मावशीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या बहिणीची १५ वर्षीय मुलगी त्यांच्याकडे २ जूनला सुट्यांमुळे आली होती. ८ जूनला सायंकाळी साडेसातच्या सुमारास कुरकुरे आणण्यासाठी मावशीकडून ५ रुपये घेऊन ती गेली. त्यानंतर परतलीच नाही. दुकानदाराने सांगितले, की कुरकुरे घेण्यासाठी आलीच नाही. मुलीचा आजूबाजूला, परिसरात, नातेवाइकांकडे, बसस्थानक, रेल्वेस्टेशन सगळीकडे शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास विनोद आबूज करत आहेत.
आणखी महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : छत्रपती संभाजीनगरच्या जस्ट पॅक इंडस्ट्रीज कंपनीला भीषण आग
By City News Desk
Latest News
09 Feb 2026 11:41:16
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर...

