सातारा परिसरात चोरट्यांचा कहर; वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून किडनी बाहेर काढण्याची धमकी देत ९ तोळे सोने लांबवले!

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : झोपलेल्या वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून पोट फाडून किडनी बाहेर काढण्याची धमकी देत ९ तोळे सोने व ५ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही खळबळजनक घटना बुधवारी (११ सप्‍टेंबर) पहाटे तीनला सातारा परिसरातील साई संस्कृती सोसायटीजवळीलील डिलक्स पार्ककमध्ये घडली. शांताबाई जयंतीलाल जैन (वय ७२) या मुलगा, सून, नातवंडांसह डिलक्स पार्कमधील रो […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : झोपलेल्या वृद्धेच्या गळ्याला चाकू लावून पोट फाडून किडनी बाहेर काढण्याची धमकी देत ९ तोळे सोने व ५ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. ही खळबळजनक घटना बुधवारी (११ सप्‍टेंबर) पहाटे तीनला सातारा परिसरातील साई संस्कृती सोसायटीजवळीलील डिलक्स पार्ककमध्ये घडली.

शांताबाई जयंतीलाल जैन (वय ७२) या मुलगा, सून, नातवंडांसह डिलक्स पार्कमधील रो हाऊसमध्ये राहतात. मंगळवारी रात्री घराच्या तळमजल्यावरील बेडरूममध्ये त्या झोपलेल्या होत्या. पहाटे तीनला तीन चोरटे घरात शिरले. एकाने शांताबाई यांचा गळा दाबला. दुसऱ्याने गळ्याला चाकू लावत मराठीतून आवाज करू नको, आवाज केला तर तुझी किडनी काढून घेईन व मारून टाकेन, अशी धमकी दिली.

मुलगा, सून, नातवंडे पहिल्या मजल्यावर झोपलेले असल्याने त्यांच्या खोलीकडे चोरटे जातील, या भीतीने त्या गुपचूप बसल्या. चोरांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सहा बांगड्या, अंगठ्या, कानातले काढून घेतले. मोबाइल हिसकावून कपाटाचे लॉकर तोडत पाच हजार रोख काढून घेत पळ काढला. चोरटे जाताच शांताबाईंनी आरडाओरड केली. त्यामुळे त्यांचा मुलगा विपुलकुमार खाली धावत आला. शेजारीही धावून आले. ते पाठलाग करण्याच्या शक्यतेने चोरांनी त्यांच्यावर दगड फेकून अंधारात पायी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच साताऱ्याचे पोलिस निरीक्षक संग्राम ताठे, पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे श्वान चाटे स्कूलपर्यंत जाऊन घुटमळले. घटनेमुळे नागरिकांत दहशत पसरली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी करत आहेत.

हा ऐवज नेला चोरून…
सोन्याची साखळी किंमत ६० हजार रुपये
सोन्याच्या ६ बांगड्या किंमत २ लाख ८० हजार
सोन्याची अंगठी किंमत २० हजार रुपये
कानातील २ रिंगा किंमत २० हजार
रोख रक्‍कम ५ हजार रुपये
मोबाइल किंमत २ हजार रुपये
एकूण किंमत ३ लाख ८७ हजार रुपये

आणखी महत्त्वाच्या बातम्या

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!

Latest News

विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले! विट्स हॉटेल चौक- देवगिरी कॉलेज रोडवर लुटारूंचा सापळा, आठच दिवसांत दुसरी लुटमार, तीक्ष्ण हत्याराने वार करून तिघांनी आणखी एका तरुणाला लुटले!
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : विट्स हॉटेल चौकातून देवगिरी कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर लुटारू सापळा लावून थांबलेले असतात. एकटेदुकटे कुणी...
UPSC मध्ये नवीन भरती सुरू, २ लाख रुपयांपर्यंत पगार, नोकऱ्यांसाठी पात्रता जाणून घ्या...
CUET PG करिता रजिस्ट्रेशन सुरू, परीक्षा मार्चमध्ये होणार, या गोष्टी लक्षात ठेवा...
१७,००० रुपयांच्या नोकरीवर मारली लाथ, आता वर्षाकाठी १७ लाखांची करताहेत उलाढाल!
३ दिवसांपासून पोटात अन्न-पाण्याचा कण नाही, वडगाव कोल्हाटीत उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती बिघडली, डॉक्टर म्हणाले, उद्या आणखी बिकट होईल स्थिती...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software