लग्‍नाचे आमिष दाखवून युवतीवर वर्षभर बलात्‍कार; तिने नकार दिल्यावर धमक्या द्यायचा, हर्सूलची धक्कादायक घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार बलात्‍कार केला. शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिच्यासह तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी युवक देत होता. ही घटना राधास्वामी कॉलनी, जटवाडा भागात समाेर आली असून, युवकाविरुद्ध हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कुर्बान पटेल चांद पटेल (वय ३५, रा. फुलंब्री) संशयिताचे नाव आहे. तक्रारदार युवतीसोबत त्‍याचे […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार बलात्‍कार केला. शारीरिक संबंध ठेवले नाहीतर तिच्यासह तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी युवक देत होता. ही घटना राधास्वामी कॉलनी, जटवाडा भागात समाेर आली असून, युवकाविरुद्ध हर्सूल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुर्बान पटेल चांद पटेल (वय ३५, रा. फुलंब्री) संशयिताचे नाव आहे. तक्रारदार युवतीसोबत त्‍याचे प्रेमसंबंध होते. यातून त्‍याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. तिने नकार दिला की तो तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी द्यायचा, असे युवतीने तक्रारीत म्‍हटले आहे. ही घटना २०२३ च्या रमजान महिन्यापासून १५ मे २०२४ या काळात राधास्वामी कॉलनीत घडली. केवळ उपभोग घेत होता, मात्र लग्न करत नसल्याने युवतीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी कुर्बानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

अल्पवयीन मुलीला पळवले…
गल्लीतच राहणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास बनेवाडी, अयोध्यानगरी भागात घडली. आदित्य जनार्दन हिंगे (रा. बनेवाडी) असे संशयिताचे नाव असून, मुलीच्या पालकांनी आता दिलेल्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलिसांनी आदित्यविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक

Latest News

आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक आ. संजय केणेकरांच्या कार्यालयात आढळलेले 'ते' पिस्तुल नव्हे एअरगन!, संशयिताला अटक
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आ. संजय केणेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात...
कामगारानेच मालकाचा केला विश्वासघात!; मोंढा नाक्यावरील मेट्रो वाईन शॉपमध्ये काय घडलं... व्हिडीओसह, पहा कशी केली चोरी...
माणुसकीचे अनोखे दर्शन : मुलाच्या फीचे हरवलेले ३० हजार रुपये तत्परतेने केले महिलेस परत, सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, सिडकोतील घटना
सिटी चौक भागातील अग्रवाल केबल दुकान फोडले
स्मार्टफोनवरील व्हॉल्यूम बटणे केवळ आवाज वाढवणे, कमी करण्यासाठी नाहीत... अनेक कामांसाठीही करू शकतात उपयोग!
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software