मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या प्रोझोन मॉलमधील H&M गारमेंट स्टोअरमध्ये SC तरुणाचा छळ, जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक; डिपार्टमेंट मॅनेजर म्हणाला, मै एससी लोगो कें साथ काम करना पसंद नही करता…

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या प्रोझोन मॉलमधील एच अँड एम गारमेंट स्टोअरमध्ये अनुसूचित जातीच्या तरुणाचा छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी एच अँड एम गारमेंट स्टोअरचा डिपार्टमेंट मॅनेजर मोहित ठाकूर याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा बुधवारी (२९ ऑगस्ट) दाखल केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक देत मै एससी लोगो कें साथ […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या प्रोझोन मॉलमधील एच अँड एम गारमेंट स्टोअरमध्ये अनुसूचित जातीच्या तरुणाचा छळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिडको एमआयडीसी पोलिसांनी एच अँड एम गारमेंट स्टोअरचा डिपार्टमेंट मॅनेजर मोहित ठाकूर याच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा बुधवारी (२९ ऑगस्ट) दाखल केला आहे. जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक देत मै एससी लोगो कें साथ काम करना पसंद नही, असे मोहित ठाकूर म्हणाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सिमोन बाळू पाखरे (वय ३१, रा. भाटेपुरी, ता. जि. जालना ह. मु. इंदिरानगर गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तो प्रोझोन मॉलमधील एच अँड एम गारमेंट स्टोअरमध्ये सेल्स ॲडव्हायझर म्हणून नोकरी करतो. ३० जून २०१७ त्याने नोकरी सुरू केली. ५ वर्षे त्याचे काम सुरळीत सुरू होते. सन २०२३ पासून डिपार्टमेंट मॅनेजर मोहित ठाकूर याच्या हाताखाली त्याला काम देण्यात आले. त्याने सिमोनची चौकशी केली. त्यात त्याने त्याला जातीब‌द्दल विचारणा केली. त्यावेळी सिमोनने त्याला अनुसूचित जातीचा असल्याचे सांगितले होते. त्यावर तो म्हणाला, की ही कंपनी खूप मोठी आहे. तुझी या कंपनीत जॉब करायची हैसियत नाही. हे ऐकून सिमोनला वाईट वाटले.

मात्र मोहित सिनियर असल्याने तो त्याला काही बोलला नाही. त्यानंतर सिमोनने पार्ट टाईम जॉब ऐवजी फुल टाईम जॉब करण्याचा प्रयत्न केला असता मोहितला ही बाब आवडली नाही. त्याने सिमोनला जातीय द्वेष भावनेने त्रास देणे सुरू केले. निंदनीय, अशोभनीय व अपमानजनक जातीवाचक भाषा वापरून सिमोनला तो वारंवार त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून सिमोनने कंपनीच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

ई-मेलवर अन्यायाची हकीकत पाठवली. मात्र न्याय मिळण्याऐवजी मोहित वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून आणखीनच त्रास देऊ लागला. मोहित ठाकूरने वरिष्ठांना सिमोनविरुध्द खोटे अहवाल पाठवून कामावरून काढण्यासाठी प्रयत्न केले. मोहितने कंपनीचे वरिष्ठ रक्षीता टी. आर. यांनासुध्दा सिमोनविरुध्द खोटे अहवाल पाठवून व त्यांची दिशाभूल करून त्रास देणे सुरू केले. त्यामुळे सिमोनने रक्षीता टी आर यांना प्रत्यक्ष भेटून मोहितच्या त्रासाबद्दल सांगितले. मात्र त्यांनीसुध्दा या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सिमोनने तक्रारीत केला आहे.

मै एससी लोगो कें साथ काम करना पसंद नही करता…
मोहितच्या त्रासामुळे सिमोनचे प्रचंड मानसिक खच्चीकरण झाले. काही दिवसांपूर्वी सिमोनने मोहितला त्याच्याकडून होत असलेले शारीरिक व मानसिक त्रास थांबविण्याची विनवणी केली. त्यावर मोहित ठाकूर म्हणाला, की तुम जैसे लोग मुझे बिलकुल पसंद नही है, तुम दुसरा कोई काम देखो… मै एससी लोगो के साथ काम करना पसंद नही करता और अभीतक किया भी नही… मैं तुझे यहा से निकाल ही दूंगा… अशी धमकी देऊन मोहितने शिवीगाळ केली. सिमोन ज्या शाखेत काम करतो तेथे इतर कामगारांतदेखील मोहितने बदनामी केली. त्याच्या अशा वागण्यामुळे सिमोनला स्टोअरमध्ये अपमानास्पद प‌द्धतीने जीवन जगावे लागत असल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. जानेवारी २०२३ पासून २५ ऑगस्टच्या सायंकाळी साडेसातपर्यंत प्रोझोन मॉलमधील एच अँड एम गारमेंटमध्ये डिपार्टमेंट मॅनेजर मोहित ठाकूरने जातीवाचक अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक देऊन शिविगाळ केली. खोटे अहवाल व फिडबॅक पाठवून वरिष्ठांची दिशाभूल करून कामावरून काढुन टाकण्याची धमकी दिली, असे सिमोनने तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन पाटील यांच्याकडे दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे त्‍यांना तपासात सहकार्य करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना

Latest News

१९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना १९ वर्षीय तरुणाला प्रशिक्षण न देताच मशीनवर बसवले, बोटे गेली..., वाळूज MIDC तील ‘या’ कंपनीतील दुर्घटना
छत्रपती संभाजीनगर (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील पंढरपूर येथील कामगार चौकातील श्री जगदीश जयदीप इंडस्ट्रीज कंपनीत १९ वर्षीय तरुणाला...
चिकलठाण्याच्या हिनानगरमध्ये गोदामाला भीषण आग, मंडप डेकोरेशनचे लाखो रुपयांचे साहित्य खाक, आकाशात धुराचे लोट
कोलठाणच्या तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगरची दुर्दैवी घटना
लेक-सुनेला भेटायला गेल्या... उल्कानगरीत चोरट्यांनी घर साफ केले, पावणेदोन लाखांची चोरी !
धक्कादायक : एमजीएम हॉस्पिटलमधून रुग्णाच्या नातेवाइक महिलेची पर्स चोरीला गेली...
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software