बिल्डरचे घर फोडले; ३ चोरटे CCTV त कैद, जटवाडा रोडवरील घटना

On
Copying of any text or photographs published on this website in whole or in part without the permission of 'Metropolis Post' newspaper is strictly prohibited. Please note that legal action will be taken if anyone is found doing so. - Editor, Metropolis Post

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जटवाडा रोडवरील पटेल प्लॅनेट हे घर फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे सोमवारी (१६ सप्टेंबर) समोर आले आहे. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, बेगमपुरा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अब्दुल वाजिद अब्दुल समी पटेल (वय ४६,रा. पटेल पॅलेस, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार […]

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जटवाडा रोडवरील पटेल प्लॅनेट हे घर फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे सोमवारी (१६ सप्टेंबर) समोर आले आहे. तीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, बेगमपुरा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अब्दुल वाजिद अब्दुल समी पटेल (वय ४६,रा. पटेल पॅलेस, जटवाडा रोड, छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, ते एक वर्षापासून नवीन घर पटेल पॅलेस, जटवाडा रोड येथे कुटुंबासह राहत असून त्यांचे जुने घर जटवाडा रोडवर पटेल प्लॅनेट आहे. त्यात सध्या कोणीही राहत नाही. पटेल हे बिल्डर आहेत. १५ सप्टेंबरला सायंकाळी ते कुटुंबासोबत जेवायला बाहेर गेले असता सायंकाळी साडेसातला चुलतभाऊ फैसल अब्दुल गणी पटेल यांनी त्यांना कॉल केला. तुमचे जुने घर पटेल प्लॅनेटच्या मेनगेटचे लॉक तुटलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे अब्दुल पटेल रात्री १० ला जुन्या घराकडे गेले असता चोरट्याने मेनगेटचे कुलूप व घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात घुसून तिन्ही बेडरूममधील कपाट तोडून कपाटातील सामानाची झाडाझडती घेऊन सर्वसामान अस्ताव्यस्त पांगवून चोरीचा प्रयत्न केला. १६ सप्टेंबरला अब्दुल पटेल यांनी शेजारी राहणाऱ्यांच्या घरातील सीसीटीव्ही फूटेज चेक केले असता त्यात १५ सप्टेंबर रोजी पहाटे चार ते पाचच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्‍ती मोटारसायकलवर येऊन घराचे कुलूप तोडून घरात घुसल्याचे दिसूल आले. त्यानंतर अब्दुल पटेल यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार शिवाजी वाडेकर करत आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!

Latest News

State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ! State News : कलाकेंद्रातील मुलीवर लॉजवर तिघांचा सामूहिक बलात्कार, बीडच्या घटनेने राज्यात खळबळ!
बीड (मेट्रोपोलिस पोस्ट वृत्तसेवा) : कला केंद्रातील मुलीला अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेऊन तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली...
State Political News : मीरा-भाईंदरमध्ये महायुतीबाबत सस्पेन्स कायम!, भाजपची ‘७० पार’ची घोषणा अन्‌ शिंदे गटाचा फिफ्टी- फिफ्टी फार्मूला!!
कमावत्या पत्नीला पोटगीचा अधिकार नाही; मुंबई उच्च न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली
विभागीय आयुक्‍त कार्यालयासमोर सरपंचपती, ग्रा. पं. अधिकाऱ्याचा राडा!; दोन गटांत हाणामारी, छत्रपती संभाजीनगरची घटना, प्रकरण लातूरचे, सुनावणीसाठी होते छ. संभाजीनगरला...
मिल कॉर्नर हिट ॲन्ड रन; क्रांती चौक पोलिसांनी केला ‘या’ कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
Copyright (c) Chhatrapati Sambhaji Nagar City News All Rights Reserved.
Powered By Vedanta Software